आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी घुसखोराला बीएसएफने पिटाळले, दीनानगरच्या घटनेनंतर गस्त वाढवली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर- अमृतसरला लागून असलेल्या पाकिस्तानी सीमेतून घुसखोरी करण्याचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) हाणून पाडला. शनिवारी रात्री बीएसएफचे जवान गस्तीवर होते. त्याच वेळी हालचाल आणि जवानांनी गोळीबार करताच घुसखोर एके-४७ च्या गोळ्या सोडून पळाला.
बीएसएफने भिंडी सैंदां ठाण्यात दाखल केलेल्या अहवालानुसार, ६७ व्या बटालियनच्या जवानांनी गोळीबार केल्यानंतर घुसखोराने मागच्या मागे धूम ठोकली. पळताना त्याच्या जवळच्या एके ४७ च्या ११ गोळ्या खाली पडल्या. त्याच्याजवळ एके ४७ रायफल होती. दीनानगरच्या घटनेनंतर बीएसएफने गस्त आणखी वाढवली आहे. कोणत्याही हालचालींकडे दुर्लक्ष करू नका, असे कडक निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. बीएसएफने पंजाब फ्रंटियरवरून २०१५ या वर्षात आतापर्यंत १३९.८५७ किलो हेरॉईन, ३८ हजार बनावट भारतीय नोटा, नऊ शस्त्रे, सात मॅगझिन, ९९ राउंड गोळ्या (१९ व्यतिरिक्त) जप्त केल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...