आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपवराच्या शुद्धलेखनातील चुकांमुळे मुलीने लग्न मोडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मैनपुरी - विवाहप्रसंगी छोट्या-मोठ्या कारणांसाठी नाते तुटण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे मंगळवारी एक नाते केवळ लेखनकौशल्याच्या अभावामुळे तुटले. वराला हिंदीतील काही शब्द अचूकतेने लिहिता आले नाहीत.  

मैनपुरी जिल्ह्यातील मुलीचा विवाह फरुखाबादच्या तरुणाशी ठरला होता. मुलगा १२ वी पास आणि मुलगी केवळ ५ वी पास आहे. सोमवारी दोघांची भेट मैनपुरीच्या नुमाईश ग्राउंड येथे निश्चित झाली. मंगळवारी दोघेही आपल्या कुटुंबीयांसह तेथे पोहोचले. मुलाने मुलीला एक डायरी काढून दिली. त्याने हिंदीत काही लिहिण्यास सांगितले. मुलीने ते अचूकरीत्या लिहिले. मुलाने मुलगी पसंत असल्याचे सांगितले. मात्र मुलीनेही मुलाकडून काही लिहून घेण्याचे ठरवले. तिने मुलाला डायरी आणि पेन दिले. ‘सांप्रदायिक’, ‘दृष्टिकोन’, ‘परिश्रम’ असे शब्द लिहून दाखवण्यास तिने सांगितले. मुलाकडून त्याच्या घराचा पत्ता लिहून घेतला. डायरी तपासल्यावर मुलामध्ये लेखनकौशल्य नाही हे सिद्ध झाले. सर्व शब्द चुकले होते. मुलीने चिडून मागणी नाकारली.  नातेवाईक आणि परिचितांनी दोन्ही कुटुंबांना समजावून सांगण्याची पराकाष्ठा केली. मात्र मुलगी काही या स्थळासाठी राजी झाली नाही.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...