आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रसेन रथयात्रेचा गोल्डन बुक ऑफ रेकाॅर्ड मध्ये समावेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झुंझुनूं, उदयपूरवाटी - इंदूरहून शेखावाटी येथे आलेल्या अग्रसेन रथ यात्रेचा गोल्डन बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये समावेश झाला. गोल्डन बुकच्या प्रतिनिधींनी शनिवारी याबाबतचे प्रमाणपत्र दिले. अग्रवाल समाजाच्या केंद्रीय समिती इंदूरतर्फे शेखावाटी येथील पाच प्रमुख तीर्थक्षेत्राच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. दैनिक भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली इंदूरहून एका विशेष रेल्वेने मध्य प्रदेशसह सहा राज्यांतील १२०० भाविक शेखावाटी येथे पोहोचले. खाटूश्यामजी, जीणमाता, सालासर येथून ही यात्रा रविवारी सकाळी राणीसती मंदिरात पोहोचली. भाविकांनी मंदिरात दर्शन घेऊन दुपारच्या आरतीत सहभाग घेतला. त्यानंतर अग्रवाल बंधू रविवारी संध्याकाळी शाकंभरी येथे पोहोचले. येथेही भाविकांनी मातेचे दर्शन घेऊन भक्तिभावाने आरतीत सहभाग नोंदवला. त्यानंतर सर्व भाविक हे रिंगसकडे रवाना झाले. त्यानंतर विशेष रेल्वेने यात्रा इंदूरकडे रवाना झाली.  

गोल्डन बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये सहभागी झाल्याने सन्मान  
यात्रेचा गोल्डन बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये समावेश झाल्याने सालासर येथे शनिवारी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. अरविंद बागडी म्हणाले, गोल्डन बुक ऑफ रेकाॅर्डसाठी आधीच अर्ज करण्यात  आला होता. गोल्डन बुकचे दोन प्रतिनिधी यात्रेदरम्यान सोबत होते. शनिवारी सालासर येथे गोल्डन बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. रथ यात्रेचे किशोर गोयल म्हणाले, पुढील दोन वर्षांत द्वारका आणि सोमनाथ येथे अशीच मोठी यात्रा काढण्यात येईल.