आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 खांबांच्या टेकूवर 2650 वर्षे जुना बोधिवृक्ष, झाड जगावे यासाठी वर्षातून ४ वेळा तज्ज्ञांकडून उपचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२४ तास बिहार मिलिटरी पोलिसांचे ३६० जवान सुरक्षेसाठी तैनात - Divya Marathi
२४ तास बिहार मिलिटरी पोलिसांचे ३६० जवान सुरक्षेसाठी तैनात
गया-  बिहारच्या गया येथील हा २६५० वर्षे जुना बोधिवृक्ष. बोधी मंदिरातील या वृक्षाच्या सुरक्षेसाठी बिहार मिलिटरी पोलिसांच्या चार तुकड्या(जवळपास ३६० जवान) तैनात आहेत. याच्या फांद्या एवढ्या विस्तारल्या आहेत की १२ खांबांचा त्यांना टेकू द्यावा लागतो. दरवर्षी ५ लाखांपेक्षा जास्त भाविक ज्याला भेट देतात असा देशातील कदाचित हा पहिला वृक्ष असावा. यामध्ये १.५ लाखांहून अधिक विदेशी पर्यटक असतात.
 
१४१ वर्षांपूर्वी म्हणजे सन १८७६ मध्ये महाबोधी मंदिराच्या जीर्णाेद्धारावेळी अलेक्झांडर कनिंघमने हा वृक्ष लावला होता. यादरम्यान खोदकामात सापडलेल्या लाकडाच्या काही अवशेषांचे जतन केले. यानंतर २००७ मध्ये हा वृक्ष, लाकडी अवशेष व सम्राट अशोकाने श्रीलंकेत (अनुराधापूर) पाठवलेल्या बोधिवृक्षाची डीएनए चाचणी करण्यात आली. गौतम बुद्धांना ज्या झाडाखाली बसून ज्ञानप्राप्ती झाली त्याच्या मुळापासून या वृक्षाची उत्पत्ती झाल्याचे उघड झाले. झाड निरोगी राहावे यासाठी वर्षातून चार वेळा तपासणी केली जाते. नव्या पानावरून त्याचा अंदाज बांधला जातो व त्यानुसार उपचार होतात.
 
वृक्षाची जुनी फांदी कापून त्यावर रासायनिक लेप लावला जातो. वृक्षासह मंदिराच्या देखभालीवर दरवर्षी ५ लाख रुपये खर्च केला जातो. 

- २४ तास बिहार मिलिटरी पोलिसांचे ३६० जवान सुरक्षेसाठी तैनात यामुळे या वृक्षाला महत्त्व : सन २००७ मध्ये या वृक्षाच्या डीएनए चाचणीत हा वृक्ष गौतम बुद्धांना ज्या झाडाखाली बसून ज्ञान प्राप्त झाले होते, त्याच्या मुळापासून निर्माण झाल्याचे सिद्ध झाले होते.
बातम्या आणखी आहेत...