आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बद्रीनाथ कपाट सोहळ्याच्या पूजेला पहिल्यांदाच राष्ट्रपतींची उपस्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बद्रीनाथ - बद्रीनाथ मंदिराची कपाटे उघडण्याची विधिवत पूजा शनिवारी (दि. ६) सकाळी होत असून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी राष्ट्रपतिपदावर असताना शंकरदयाळ शर्मा व प्रतिभा पाटील  यांनी बद्रीनाथ मंदिराला भेट दिली आहे. परंतु, कपाट उघडण्याच्या विधिवत पूजेला उपस्थित राहणारे मुखर्जी हे पहिले राष्ट्रपती ठरणार आहेत.  
पूजेच्या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बद्रीनाथकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवरील वाहनांची चोख तपासणी सुरू आहे. कडक सुरक्षेचे जाळे भेदत पुढे प्रवास करावा लागत असल्याने प्रवासात भाविकांचा बराच वेळ जात आहे. पूजा सोहळ्यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत, राज्यपाल के. के. पॉल आदी उपस्थित राहणार आहेत.   शुक्रवारी सकाळपासून केदारनाथ, बद्रीनाथसह परिसरात ढगाळ वातावरण होते. 

दुपारनंतर येथे सुमारे एक तास जोरदार पाऊसही झाला. त्यानंतरही हलका पाऊस सुरू होता. शनिवारी (दि. ६) सकाळी पावसाचा जोर राहिल्यास हेलिकॉप्टर येऊ शकणार नाही. त्यामुळे राष्ट्रपतींचे येणे हवामानावरही अवलंबून आहे. पावसामुळे रस्ते निसरडे झाले आहेत. केदारनाथकडील बहुतेक प्रवास हा रस्ते मार्गानेच करावा लागत असल्यामुळे निसरड्या रस्त्यांमुळे घोडे सटकत आहेत. त्यामुळे यात्रेत काही प्रमाणात अडथळे निर्माण झाले आहेत.  
राष्ट्रपतींसाठी विशेष व्यवस्था : राष्ट्रपतींसाठी मंदिराजवळच असणाऱ्या ‘गुजरात हाऊस’चे रुपडे पालटले आहे. या हाऊसमध्ये राष्ट्रपती थांबणार असून त्यांच्या सरबराईसाठी पूर्ण तयारी झाली आहे. राष्ट्रपतींच्या देखभालीसाठी पूर्ण लवाजमा दाखल झाला आहे.  
 
हजारो भाविक दाखल  
सोहळ्यासाठी बद्रीनाथमध्ये हजारोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. यापूर्वी पंतप्रधानांच्या केदारनाथ दौऱ्यामुळे तेथे कडक सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे बहुतेक भाविकांनी बद्रीनाथमध्ये राहणे पसंत केल्याने येथील गर्दी वाढली आहे.  
 
दुपारी  १२ नंतर प्रवेश  
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पूजा सकाळी नऊच्या दरम्यान होणार असून त्यानंतर काही वेळ ते मंदिर परिसरात थांबणार अाहेत. त्यामुळे भाविकांना साधारण दुपारी १२ नंंतर मंदिरात प्रवेश मिळू शकेल, असे सूत्रांनी सांगितले.  
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...