आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुण्या कलंकिताला तिकीट देणार नाही, यादी आठवड्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ  - भाजपने दावा केला आहे की ते कुणाही डाग असलेल्यास तिकीट देणार नाहीत. उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष केशवप्रसाद मौर्य यांनी चर्चेत सांगितले की, उमेदवारांची यादी तयार झाली आहे आणि आठवडाभरात ती यादी जाहीरही होईल. त्यांचे हेदेखील म्हणणे आहे की, आम्ही ना जातीचे राजकारण करत, ना कुटुंबाचे. सीएमचा चेहरा वरिष्ठ नेतृत्वच निश्चित करेल. 

-भाजपची यादी का आली नाही? 
भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. आमचा कुणीही प्रतिस्पर्धी नाही. एका प्रक्रियेअंतर्गत नाव जाहीर होतात. यादी तयार झालेली आहे. संसदीय मंडळाच्या बैठकीत ही यादी अंतिम होईल. आठवडाभरात समोर येईल. 

- दलित-मुस्लिमांना किती तिकिटे? 
आम्ही जाती पाहून तिकीट देत नाही. हे बसपामध्ये होते. ते तर दलितांनाही पैसे घेऊन तिकिटे देतात. आम्ही कार्यकर्त्यांच्या फीडबॅकवर तिकीट देणे निश्चित करतो. 

- अनेक क्षेत्रांत भाजप बॅकफूटवर आहे, विशेषकरून पश्चिम उप्रमध्ये? 
आम्ही लोकसभेच्या ७३ जागा जिंकलो होतो. म्हणजे ३३७ विधानसभा जागांवर पहिल्या क्रमांकावर होतो. आम्ही कधीही बॅकफूटवर नाही आहोत. यंदा ३०० हून अधिक जागा जिंकणार आहोत. 

- चर्चा, मुस्लिम त्यांनाच मते देतील जे भाजपला पराभूत करतील? 
जातीय आणि तुष्टीकरणाचे राजकारणवाल्यांचे दिवस संपले आहेत. मुस्लिम समजून चुकले आहेत की, प्रादेशिक पक्ष फक्त फसवतात. २०१४ मध्ये आम्हाला मिळालेली मते आणि जागा याचे साक्षीदार आहेत. मुस्लिम मते मिळतील. 

-मायावती म्हणतात की भाजप श्रीमंतांचे सरकार आहे? 
त्यांना जाणीव झाली आहे की, जनता आता त्यांच्या माकडजालात येणार नाहीये. त्या अशात पत्रकार परिषदा घेत असतात. पैसे घेऊन तिकिटे विकण्याचे दुकान उघडून बसल्या आहेत.  

-नोटबंदीचा किती परिणाम होईल? 
कोणताही परिणाम होणार नाही. लोक कौतुक करत आहेत. भ्रष्टाचार आणि काळ्या धनाच्या विरुद्ध देशाच्या सरकारमध्ये जी इच्छाशक्ती हवी होती, ती भाजपने करून दाखवली आहे. 

-  बाहेरच्या लोकांना तिकीट देणार? 
आमच्याबरोबर कोणीही कोणत्याही अटीवर आलेला नाही. आमचे जमिनीवरील कार्यकर्ते सक्षम आहेत. जो कुणी जिंकण्याच्या स्थितीत असेल त्यावर विचार करू. जे नेते अन्य पक्ष सोडून आले आहेत, ते आमच्या धोरणांवर प्रभावित होऊन आलेले आहेत. 

- भाजप उप्रमध्ये का पराभूत होते? 
निवडणुकीत हार-जीत तर होतच असते. २०१४ मध्ये जनता काँग्रेसच्या लोकविरोधी धोरणांना उबगली होती आणि हताश होती. पंतप्रधानांवर विश्वास ठेवून मते दिली होती. बसपाच्या भ्रष्टाचाराला समजून चुकली होती. जनतेने २०१४ मध्ये उत्तर दिले होते. आता वेळ सपाची आहे. 

- भाजपत सीएमचा चेहरा का नाही? 
यावर केंद्रीय नेतृत्वच निर्णय घेईल. यावर सर्वसंमतीने विचार करून कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार केला जाईल.