आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघांची संख्या वाढल्याने पन्नाचे पर्यटकांना आकर्षण, पावसाळ्यामुळे व्याघ्र प्रकल्पात तूर्त प्रवेशबंदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
भोपाळ- वन्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील पन्ना व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पर्यटकांचा आेघही सध्या वाढताना दिसून येतो. गेल्या वर्षी या कालावधीच्या तुलनेत यंदा परदेसी पर्यटक वाढले.
 
गेल्या वर्षी ३८ हजार वन्यप्रेमींनी पन्ना अभयारण्याला भेट दिली होती. त्यात १० हजारावर परदेशी पर्यटकांचा समावेश आहे. यंदा मात्र आतापर्यंत ही संख्या ३८ हजार ५४५ वर पोहोचली आहे. ३० जूनपर्यंतची ही नोंदणी आहे. त्यात देशातील २८ हजार ७९ व परदेशी १० हजार ४६६ पर्यटकांचा भेट देणाऱ्यांत समावेश आहे. अभयारण्यात वाघांच्या संख्येत झालेली वाढ पर्यटकांना आकर्षित करणारी ठरली आहे, असे क्षेत्रीय संचालक विवेक जैन यांनी सांगितले.
 
पावसाळी हंगामात मात्र पर्यटकांना पन्ना प्रकल्पात प्रवेश करण्यास मनाई असते. ३० जूनपासून ही मनाई करण्यात आली आहे. पन्ना व्याघ्र प्रकल्पात चित्ता, निलगाय, सांबर, अस्वलासह सुमारे २०० प्रजातीचे पक्षी देखील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने प्राणी-पक्ष्यांच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. 
 
संख्या ३५ वर पोहोचली : पन्ना प्रकल्पातील वाघांची संख्या आता ३५ वर पोहोचली आहे. त्यामुळे वन्यप्राणी प्रेमींचा उत्साह दिसून येतो. अलीकडेच ५ जुलै रोजी एक व्हिडिआे जारी झाला होता. त्यात तीन वाघ प्रकल्पाचे बाहेर आल्याचे दाखवण्यात आले होते. हा व्हिडिआे सोशल मीडियात व्हायरल झाला होता. काही मोटारसायकल स्वारांनी हा व्हिडिआे पोस्ट केला होता. त्यात काही वाघ रस्ता आेलांडताना दाखवण्यात आले होते. त्यानंतर सरकारने प्रकल्पात इतर अभयारण्यातून वाघ आणण्याचे धोरण हाती घेतले होते. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पर्यटन विषयक संकेतस्थळाने पन्ना व्याघ्र प्रकल्पाची उत्कृष्ट कार्याबद्दल २०१७ साठी निवडले. देशात अभयारण्याची या पुरस्कारासाठी निवड होण्याची ही सलग दुसरी वेळ आहे.
बातम्या आणखी आहेत...