आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिगरबाजांना सलाम : आईला म्हणायचा, असे काय नाव ठेवले? तेच अमर केले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुर्दम्य शौर्याची दोन मूर्तिमंत उदाहरणे. एक - अतिरेकी बेछूट गोळीबार करत असताना निधड्या छातीने त्यांना सामोरा गेलेला बीएसएफचा जवान रॉकी. रॉकी शहीद झाला, पण त्याने ५५ जवानांचा जीव वाचवला. दुसरे- अभूतपूर्व धाडस दाखवून पाकिस्तानी अतिरेक्याला जिवंत पकडणारे ते दोन तरुण. त्या जिगरबाजांच्या गावातून लाइव्ह रिपोर्ट....
फोन आल्यावर मन विषण्ण झाले, पण अनेकांचा जीव वाचून रॉकी शहीद झाल्याचे ऐकून छाती फुगली- रोहित, रॉकीचा भाऊ
शहीद रॉकीचे गाव रामगड माजराहून (यमुनानगर, हरियाणा) पोपीन पवार-
रामगड माजरा हे छोटेखानी गाव. कालपर्यंत रॉकी फक्त प्रीतपालचा मुलगा होता, आज अख्ख्या गावाचा सुपुत्र बनला आहे. तो शहीद झाल्याची बातमी गावात येऊन धडकल्यापासून गावातील एकाही घरी चूल पेटली नाही. मंदिरात आरती झाली नाही. गावाला दु:खापेक्षाही जास्त अभिमान वाटत आहे. दलित असल्यामुळे रॉकीच्या कुटुंबापासून दूर राहणारे आज सर्व बंधने तोडून त्याच्या घरी जात आहेत आणि स्वत:ला गौरव समजत आहेत. रॉकीची आई अंग्रेजो देवींना अश्रूंना आवर घालणेही अशक्य झाले आहे. दाटलेल्या कंठानेच त्या म्हणाल्या की, ‘लहान होता, तेव्हा माझ्याशी भांडायचा. आई, तू माझे असे कसे नाव ठेवले? मला हे नाव चांगले वाटत नाही, असे म्हणायचा. आता तो तेच नाव अजरामर करून गेला आहे. तीन वर्षांपूर्वीच मी त्याला देशासाठी देऊन टाकले होते.’ आता मोठा मुलगा आणि पुतण्याही सैन्यात जाण्याची तयारी करत आहे.

रॉकीचा मोठा भाऊ रोहितने सांगितले की, भावाच्या हौतात्म्याचा अभिमान आहे. रॉकी शहीद झाल्याचा जेव्हा मला बीएसएफकडून फोन आला, तेव्हा मन विषण्ण झाले, परंतु त्याने आपल्या ४४ जवानांचे प्राण वाचवले. अतिरेक्यांशी एकटाच लढला, हे ऐकून माझी छाती अभिमानाने फुगली. लढाई शस्त्राने नव्हे, तर जिगरबाजपणाने लढावी लागते, असे तो नेहमीच म्हणायचा. जेव्हा केव्हा भेटायचा तेव्हा म्हणायचा- लक्षात ठेव. एक दिवस असे काही करून दाखवीन की देशाच्या कायम स्मरणात राहीन. बहीण नेहा म्हणाली- ‘रक्षाबंधनाला येतो, असा शब्द दिला होता. आता तो येणार नाही. कोणता भाऊ असे खोटे बोलतोय का?’ रॉकीचे संपूर्ण कुटुंबच सैन्यात आहे. तीन-तीन बहिणींच्या कुंकवाचे धनी देश रक्षणासाठी तैनात आहेत. सैन्यात जाण्यापूर्वी रॉकी वडिलांसोबत वीटभट्टीवर कामाला जात होता. सैन्यावरील चित्रपट, त्यांचे किस्से ऐकण्याची त्याला खूपच आवड होती. टँगो चार्लीचा चित्रपट पाहून सैन्यात जाण्याचे त्याला वेडच लागले होते. २०१२ मध्ये तो बीएसएफमध्ये गेला. तो या गावचा पहिलाच शहीद आहे. शुक्रवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार होतील.
बातम्या आणखी आहेत...