आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

६० वर्षांपूर्वीच्या ट्रॅकचा रेल्वेलाच पडला विसर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर- रेल्वेगाड्यावेळेवर धावाव्यात म्हणून रेल्वेने ६० वर्षांपूर्वी तीन ट्रॅक तयार केले होते. अधिकारी बदलले आणि रेल्वेला या ट्रॅकचाही विसर पडला. हे ट्रॅक ग्वाल्हेर ते बिरलानगर स्टेशनदरम्यान टाकले होते. त्याचा परिणाम असा झाला की, या मार्गावर अजूनही प्रवासी रेल्वे सुरूच होऊ शकल्या नाहीत. तिन्ही मार्ग ८०० मीटर लांबीचे आहेत.

त्याचबरोबर एक इतर मार्गही टाकण्यात आला आहे ज्याचा डेड एंड बिरलानगर स्टेशनच्या आधी आहे. रेल्वेला या मार्गावर प्रवासी गाड्या चालवण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांची परवानगी मिळाली तर या आग्रा-झांशी मार्गावर ग्वाल्हेरमध्ये रेल्वे वाहतूक कधीही विस्कळीत होणार नाही. लाइन क्लिअर मिळाल्याने त्यांना उशीरही होणार नाही. सध्या या मार्गावर फक्त मालगाडी आणि शंटिंगसाठी प्रवासी गाड्या नेण्याची परवानगी आहे.