आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात महिलांना मिळेना सन्मानाची वागणूक, महिला आयोगाकडे तक्रारींचा पाऊस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सर्वच क्षेत्रांत महिला या पुरुषांच्या बरोबरीने काम करत असल्या तरी आजही त्यांना सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचे वास्तव आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील सर्वच राज्यांत महिलांची कुचंबणा होत असल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले.
सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याच्या ४,७५४ तक्रारी २०१६ मध्ये आयोगाला प्राप्त झाल्या. यात उत्तर प्रदेश पहिल्या, दिल्ली दुसऱ्या, हरियाणा आणि महाराष्ट्र अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे. तर गुजरात राज्यात कामाच्या ठिकाणी अत्याचारांच्या पाच तक्रारी प्राप्त झाल्या. विशेष म्हणजे, हुंड्यासाठी छळाच्या तक्रांरीचे प्रमाण लक्षणीय आहे. राष्ट्रीय महिला आयोगाकडे ऑक्टोबर २०१६ पर्यंत १५,४९२ विविध स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

जागृतीमुळे तक्रारी वाढतात
महिलांना आजही सन्मानजनक वागणूक मिळत नाही. अत्याचारांचे प्रमाणही वाढलेले आहे. या क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था सजग राहिल्यामुळे तक्रार करण्यासाठी महिला मोठ्या संख्येने पुढे येतात. शिवाय महिलांना न्याय देण्यासाठी पोलिस यंत्रणा सक्षमपणे कार्य करत आहे. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जाणीवजागृती केल्याने अत्याचाराच्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
विजया रहाटकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग.
बातम्या आणखी आहेत...