आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिपुरात चोरी करण्यास घुसले 12 बांगलादेशी, ग्रामस्थांच्या मारहाणीत 1 ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
आगरतळा - त्रिपुराच्या एका गावात बांगलादेशचे १२ नागरिक चोरीच्या हेतूने घुसले होते. ग्रामस्थांनी त्यापैकी एकाला बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला.

दक्षिण त्रिपुराच्या सीमेला लागून असलेल्या सिद्धीनगर गावात बुधवारी रात्री १२ बांगलादेशी नागरिक घुसले. त्यात गृह रक्षी वाहिनीचे आठ कर्मचारी (भारतीय गृहरक्षक दलाच्या समकक्ष), दोन सरकारी कर्मचारी आणि दोन सामान्य नागरिक यांचा समावेश होता. पोलिस अधीक्षक तपन देववर्मा यांनी सांगितले की, ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रत्युत्तरात हल्ला केला. त्यामुळे चोरांत एचक खळबळ उडाली. ६२ वर्षांचे गृह रक्षक नौशाद यांना लोकांनी मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. एक जण जखमी झाला आहे. पोलिसांनी त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...