आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक संस्थांना 2000 पर्यंतच्या रोख देणगीवर आता कर सवलत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मंदिर, मशिदीसह धार्मिक विश्वस्त संस्थांना केवळ दोन हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम देणगी स्वरूपात दिली असेल तर तितक्याच रकमेवर कर सवलत मिळणार आहे. २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने आयकर कायद्याच्या ८० जीनुसार रोख देणगीची मर्यादा १० हजार रुपयांहून घटवत दोन हजारांपर्यंत केली आहे. 
   
कर सवलत घेण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात रोख देणगीच्या बनावट पावत्यांचा आधार घेत असल्याने सरकारने हे पाऊल  उचलले आहे. चेक किंवा डिजिटल माध्यमातून दोन हजारांपेक्षा जास्त रक्कम देणगीस्वरूपात देऊन करात सवलत घेता येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. आयकर कायद्याच्या कलम ८० जीनुसार निवडक मदत निधी आणि नामांकित चॅरिटेबल ट्रस्टला दिल्या जाणाऱ्या देणगीला निव्वळ उत्पन्नात सामील केले जाणार नाही. देणगीची ही रक्कम करपात्र बनण्यापूर्वीच बाहेरील रक्कम मानली जाईल. आतापर्यंत १० हजारांपर्यंतच्या रकमेवर करात सवलत दिली जात होती.    

अधिसूचित संस्थांना देणगी दिल्यासच कर सवलत   
आयकर नियमांनुसार केंद्र सरकारने अधिसूचित केलेली मंदिरे, मशिदी, गुरुद्वारा, चर्चना देणगी दिली असेल तरच करात सवलत मागण्याचा दावा केला जाऊ शकतो. मंदिर, मशीद, गुरुद्वाऱ्यामध्ये नवनिर्माण, दुरुस्तीचे काम करण्यासाठी देणगी दिली असेल तर ती ग्राह्य मानली जाईल. देणगीच्या रकमेवर ५० टक्क्यांवर सूट मिळणार आहे.   

काय आहेत अटी ?    
- कराचा लाभ घेण्याचा दावा करताना आपल्याकडे रोख देणगीची पावती असणे आवश्यक   
- चेक किंवा डिजिटल पेमेंटने देणगी देऊन कर सवलत हवी असल्यास यासाठी काही मर्यादा नाही   
- नामांकित, नोंदणीकृत संस्थेला चेक किंवा डिजिटल पेमेंट दिल्यासच कर सवलत मिळेल   
- आपद््ग्रस्त काळात देणगीरूपात कपडे दान केले असतील तर कर सवलत मिळणार नाही   
- निवडक संस्थांसाठी देणगीच्या रकमेवर १०० किंवा ५० टक्क्यांपर्यंत करात सवलत मिळू शकते .
- कलम ८० जीनुसार विदेशी ट्रस्ट आणि राजकीय पक्षांना देणगी दिली जात असल्यास कुठलीही सूट मिळणार नाही   
बातम्या आणखी आहेत...