आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सपातील यादवी: EC ने दोन्ही गटांकडे मागवले उत्तर, CM ने बोलावली बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने समाजवादी पार्टीच्या चिन्हाच्या वादाच्या मुद्द्यावर अखिलेश आणि मुलायमसिंह यादव यांच्या गटांकडून 9 जानेवारीपर्यंत उत्तर मागवले आहे. दोन्ही गट सायकल चिन्हावर दावा करत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुलायमसिंह आणि अखिलेश दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाची यासंदर्भात भेट घेऊन म्हणणे मांडले होते. रामगोपाल यादव यांनी तर 90 टक्के आमदार अखिलेश यांच्याबरोबर असल्याचा दावाही केला होता. दरम्यान अखिलेशने लखनौमध्ये संसदीय पक्षाची बैठक बोलावली असून बैठकीला सुरुवात झाली आहे. 

निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना विचारली समर्थकांची संख्या
- एएनआय या न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार निवडणूक आयोगाने दोन्ही गटांकडून पार्टी आणि निवडमूक चिन्हावरील दाव्यासंदर्बात 9 जानेवारीपर्यंत उत्तर मागवले आहे. 
- दोन्ही गटांच्या पाठिशी किती आमदार आहे, अशी विचारणाही करण्यात आली आहे. 

निवडणुकीच्या रणनितीबाबत बैठक 
- अखि‍लेश यादव यांनी गुरुवारी मुख्‍यमंत्री निवासस्थानी आमदारांची बैठक बोलावली आहे. 
- बुधवारी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झालेली असल्याने ही बैठक महत्त्वाची असल्याचे मानले जात आहे. 
- या बैठकीत अखिलेश आगामी रणनितीबाबत चर्चा करणार आहेत. तसेच लोकांमध्ये कशाप्रकारे चांगला संदेश द्यायचा याबाबतही चर्चा होईल. 

अशा घडल्या घडामोडी... 
- मुलायम यांनी 2 जानेवारीला निवडणूक आयोगात भेट घेऊन म्हणणे मांडले होते. त्यावेळी अमरसिंह आणि जयाप्रदाही त्यांच्याबरोबर होते. 
- मुलायम यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावर आणि निवडणूक चिन्हावर दावा केला होता. 
- चिन्हावरील वादाबाबत बोलताना सायकल तर माझीच आहे असे मुलायम म्हणाले होते. 
- अखिलेश गटाच्या रामगोपाल यांनीही 3 जानेवारीला निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. 
- मुख्यमंत्र्यांना 90 टक्के आमदारांचा पाठिंबा असल्याचे ते म्हणाले होते. 
- UP मद्ये विधानसभेच्या 403 जागांसाठी मतदान होणार आहे. 

चिन्हावरून वाद का? 
- अखिलेश आणि मुलायम दोघांनीही निवडणुकांसाठी उमेदवारांची वेगवेगळी यादी जाहीर केली आहे. 
- पार्टीच्या या वादामुळे आता दोन्ही गटांना सायकल चिन्हावरच निवडणूक लढवायची आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...