आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदयपूरमध्ये ब्राह्मण परिवाराची दोन पिढ्यांपासून दर्ग्याची सेवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपूर- काही घटक लोकांना धार्मिक वादातून विभागण्याचा प्रयत्न करत असतात. अशा काळात राजस्थानातील उदयपूर येथे काली बावडी येथील सुफी संत सौदागर बाबा यांच्या दर्ग्याची सेवा एका ब्राह्मण परिवाराच्या दोन पिढ्यांकडून करण्यात येत आहे.  

भरत शर्मा या त्रेपन्नवर्षीय हे सेवेकरी बाबांच्या दर्ग्यावर गेल्या २० वर्षांपासून सेवा बजावत आहेत. ते रोज सकाळी ६ ते ११ दरम्यान संध्याकाळी ५ ते ८.३०  या वेळेत दर्ग्यावर उपस्थित असतात. शुक्रवारी विशेष इबादत असते. भरत शर्मा म्हणाले, माझे वडील राधाकृष्ण शर्मा यांनी ४५ वर्षे सेवा केली. राधाकृष्ण शर्मा यांचे वडील हरिराम तेली इबादत करत असत. सामाजिक सलोख्याचे उदाहरण म्हणून भरत शर्मांकडे पाहता येईल. त्यांनी माता मंदिराचीही देखभाल केली आहे. तेथेही ते नियमित पूजा-आरती करतात.  

उरुसात येणाऱ्या भाविकांसाठी हिंदू तयार करतात प्रसाद  
येथील राजकुमार जैन, आशिष तलरेजा व इतरांनी सांगितले, बाबाच्या उरूस शबे बारातला चंद्राच्या ६ आणि ७ तारखेस साजरा होतो. येथे येणाऱ्या भाविकांसाठी प्रसाद व गोड भात आणि चणा डाळीचा पुलाव काली बावडी येथील सर्व हिंदूच तयार करतात. या वेळी चंद्रदर्शनानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उरूस साजरा होण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...