आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उज्जैन येथे महाकालच्या थंडाव्यास 11 माठांतून जलधारा अभिषेक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैन- उन्हाळ्यात मध्य प्रदेशातील उज्जैन येथे महाकालला थंड ठेवण्यासाठी पहाटे चार वाजता भस्मारतीच्या वेळी तेथील पंडे आणि पुजाऱ्यांनी गर्भगृहात मुख्य शिवलिंगावर ११ मातीचे माठ बांधून त्यातून जलधारा अभिषेक सुरू केला आहे. 

महाकाल मंदिराचे पुजारी प्रदीप गुरू यांनी सांगितले...
वलिंगावर तसे तर वर्षभर चांदीच्या कलशातून मस्तकाभिषेक होत असतो. पण वैशाख आणि ज्येष्ठ महिन्यात ऊन खूप कडक असते. त्यामुळे देवाला थंड वाटावे म्हणून या ११ माठांतून जलधारा अभिषेक केला जातो. उन्हाळ्यात थंड पाण्याचा आणि थंडीत गरम पाण्याचा अभिषेक करण्याची परंपरा आहे.  

२ दोन महिने ११ तास माठांतून पाणी  
गभगृहात बांधण्यात आलेल्या माठांतून रोज पहाटे भस्मारती झाल्यानंतर सकाळी ६ ते सायंकाळी ५ पर्यंत ११ तास पाण्याचा अभिषेक होत असतो. संध्याकाळी पूजेनंतर पाणी येत नाही. यामुळे माठ हटवण्यात  येतात.
बातम्या आणखी आहेत...