आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयोमर्यादेआधीच मुलांचा होतो विवाह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- गेल्या एक दशकात निश्चित केलेल्या वयोमर्यादेआधी मुलींचा विवाह करण्याची प्रकरणे तर कमी होत आहेत, पण मुलांची स्थिती सुधारण्याऐवजी बिघडली आहे. मुलांसाठी लग्नाची वयोमर्यादा २१ वर्षांपेक्षा जास्त आहे. पण त्याआधीच मुलांचे लग्न लावून देण्याचे प्रमाण तामिळनाडू, आसाम, गोवा, मणिपूर आणि त्रिपुरा या राज्यांत गेल्या एक दशकात घटण्याऐवजी वाढले आहे.
 
इतर काही राज्यांतही मुलांचा विवाह निश्चित केलेल्या वयोमर्यादेआधी करण्याचे प्रमाण हळूहळू घटत आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या २००५-२००६ च्या निकालाशी २०१५-१६ च्या निकालांची तुलना केल्यानंतर ही वस्तुस्थिती समोर येत आहे. 

गोव्यात मुलांचा विवाह लवकर करून देण्याचे प्रमाण २००५-२००६ मध्ये ७.२ टक्के होते. ते २०१५-१६ मध्ये ३.४ टक्क्यांनी वाढून १०.६ टक्के झाले आहे. तामिळनाडूत मुलांचा विवाह निश्चित वयोमर्यादेआधी करून देण्याच्या प्रमाणात ३ टक्के वाढ झाली आहे. निश्चित वयोमर्यादेआधी मुलांचा विवाह करण्यात गुजरातमध्ये फक्त ३ टक्के आणि महाराष्ट्रात फक्त ४ टक्के घट दिसली आहे. 

छत्तीसगडसारख्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या असणाऱ्या राज्यात २००५-२००६ मध्ये निश्चित वयोमर्यादेआधी मुलींचा विवाह करण्याचे प्रमाण २०१५-१६ मध्ये ३४ टक्क्यांनी कमी झाले आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...