आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसच पीडित महिलांवर करतात अतिप्रसंग: स्मृती इराणी, 50 टक्के महिला मतदार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - येथील सरकारचे महिलांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होते आहे. महिला तक्रार देण्यास गेल्या तर पोलिसच त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करतात, असा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकारांशी बोलताना केला. राज्यात महिलांच्या प्रकरणांचा तपास करताना त्यांचे शोषण होते. आमचे सरकार जर सत्तेवर आले तर एक हजार महिलांचे वेगळे पोलिस पथक तयार करण्यात येईल. महिला ५० टक्के मतदार असताना पोलिस दलात फक्त ४ टक्के महिला आहेत, असे त्या म्हणाल्या.  

समाजवादी पक्षाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या : या पक्षाने प्रत्येकवेळी नोकरीचे आश्वासन देऊन सत्ता काबीज केली आहे. आजही तो पक्ष नोकरीचेच आश्वासन देतो आहे. मुली शाळेत जाताना रस्त्यावर त्यांची छेड काढली जाते. यासाठी रोडरोमिओविरोधी पथकांची स्थापना केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. शिक्षणासाठी मुलींच्या खात्यात त्यांच्या वर्गानुसार खात्यात पैसे जमा केले जातील. विनय कटियार यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्या भडकल्या. माझ्यासंदर्भात वढेरा टिप्पणी करत होते, तेव्हा प्रियंका गांधी यांनी त्यांना विरोध का केला नाही? तेव्हा प्रियंकांनी माफी मागितली होती का? असा संतप्त प्रश्न केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी उपस्थित केला.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...