आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमपीमध्ये मनोकामनेसाठी कैदी मंदिरात अर्पण करतात हातकड्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीमच- मंदिरात फळे-फुले, सोने-चांदी अर्पण करण्याबाबत तुम्ही ऐेकले आहे, पण आपल्या देशात एका मंदिरात तुरुंगातून सुटलेले कैदी हातकड्या अर्पण करतात, ही माहितीही नवीन आहे.  

मध्य प्रदेशातील  नीमच जिल्हा मुख्यालयापासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या जालिनेर गावात खाखरदेव मंदिर वेगळ्याच कारणाने प्रसिद्ध आहे. येथे सर्वसामान्य नागरिकांसोबत  गुन्हेगार आणि कैदीसुद्धा पूजा करतात. या मंदिरात येणारे कैदी एक तर पळून जाण्यासाठी किंवा जामिनावर सुटण्यासाठी प्रार्थना करत असतात. त्यांची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर फरार झालेले कैदी येथे रात्रीच्या सुमारास येतात आणि हातकड्या  अर्पण करतात. जालिनेरच्या या नाग मंदिरात हातकड्या वाहणारे कैदी हे अफू विक्रेते आहेत. 

खासगीमध्ये सर्वसामान्य लोक यांची नावे खूप दबक्या आवाजात घेतात. मंदिराचे पुजारी शिवनारायण मेघवाल यांनी सांगितले, सुमारे ५० वर्षांपूर्वीचे हे मंदिर आहे. तेव्हापासून या मंदिरात हातकडी वाहण्याची परंपरा आहे. येथे गुन्हेगार रात्रीच्या सुमारास गुपचूप येतात. पण भक्तगणही मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. गुन्हेगाराबरोबरच नागदेवता सामान्य लोकांच्या मनोकामना पूर्ण करते, अशी लोकांत चर्चा आहे. अफूची तस्करी करणारे आणि तुरुंगातून पळून गेलेले कैदी येथे मोठ्या संख्येने श्रद्धेने दर्शनास येतात, ही मात्र धक्कादायक बाब आहे. फरार झालेल्या कैद्यांच्या शोधासाठी,  पोलिसांना ही घटना आव्हानात्मक आहे. 
बातम्या आणखी आहेत...