आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर खोऱ्यामध्ये १०० दिवसांपासून अशांतता, बुरहान वाणीच्या मृत्यूपासून तणाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वानी ठार झाल्यापासून काश्मीर अशांत आहे. रविवारी काही भागांत संचारबंदी शिथिल करण्यात आली होती; परंतु हिंसक घटनाही थांबलेल्या नव्हत्या.

दक्षिण काश्मीरमध्ये ८ जुलै रोजी वानीचा खात्मा झाला होता. त्यानंतर स्थानिक बंडखोरांनी केलेल्या हिंसक आंदोलन व सुरक्षा दलासोबतच्या धुमश्चक्रीत ८४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात दोन सुरक्षा जवानांचाही समावेश आहे. तेव्हापासून आतापर्यंत हजारो लोक जखमी झाले होते. काश्मीरमधील अशांततेचा रविवारी शंभरावा दिवस होता. काही भागात फुटीरवाद्यांनी आपले आंदोलन काही दिवसांसाठी मागे घेतले होेते; परंतु आंदोलन थांबवण्यात आलेले नाही. त्यामुळे संपूर्ण खाेऱ्यात हिंसाचार सुरूच आहे. १०० दिवसांपासून बाजारपेठ पूर्णपणे बंद आहे. शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आल्याने मुलांच्या शिक्षणावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे.

हुर्रियतविरोधात संताप
काश्मीर अशांत असले तरी हुर्रियतच्या सातत्याने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला स्थानिक नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे काही भागांत दुकाने उघडण्यात येऊ लागली आहेत. हळूहळू लोक घराबाहेर पडू लागले आहेत. त्यांच्या मनात हुर्रियतविषयीचा संताप दिसून येत आहे. परंतु काश्मीरमधील मोबाइल, इंटरनेट सेवा मात्र अद्यापही पूर्णपणे सुरू करण्यात आलेली नाही.
बातम्या आणखी आहेत...