आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा सत्ता आल्यास सीएमसाठी अखिलेशचे नाव सुचवू : शिवपाल यादव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बलिया - समाजवादी पार्टीत काेण काय बोलेल याचा काही नेम राहिलेला नाही. कालपर्यंत अखिलेश यादव यांच्या नावाला विरोध होत असतानाच आता प्रदेशाध्यक्ष शिवपाल सिंह यांनी पुन्हा सत्ता मिळाल्यास अखिलेश यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी सुचवू असे म्हटले आहे.

पक्षाचे ज्येष्ठ नेते राम गोपाल यादव यांनी शनिवारी अखिलेश यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात यावे, असे म्हटले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवपाल यांनी त्यांच्या सुरात सूर मिसळल्याचे दिसून आले. राम गोपाल हे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. ते पक्षाध्यक्षांना पत्र लिहून तसा सल्ला देऊ शकतात. त्यात काही गैर नाही. त्याशिवाय पक्षाला पुन्हा सत्ता मिळाल्यास मीदेखील अखिलेश यांच्या नावाचा प्रस्ताव मांडणार आहे, असे शिवपाल यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राम गोपाल यांनी शनिवारी मुलायम यांना पत्र पाठवून हा सल्ला दिल्याचे वृत्त आले होते. अखिलेश हे राज्यात सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. सपाला राज्यात पुन्हा विजय हवा असल्यास सीएम पदाचे उमेदवार म्हणून अखिलेश यांनाच संधी दिली जावी. तुम्ही कोणताही निर्णय घेऊ शकता, असे राम गोपाल यांनी पत्रातून म्हटले होते.
पुढे वाचा, मुलायमसिंहांच्या कुटुंबातील दुहीचा समाजवादी पक्षाला बसणार फटका
शीला दीक्षित यांचा दावा, अनेकांची काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा

बातम्या आणखी आहेत...