आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी: उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाची मंजुरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीला उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. यासंबंधीचे विधेयक आता १५ मे रोजी होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.
 
सभागृहाने जीएसटी विधेयकाला पारित केले तर जीएसटीला मंजुरी देणारे उत्तर प्रदेश हे देशातील पाचवे राज्य ठरेल. या आधी झारखंड, तेलंगणा, बिहार, राजस्थान या राज्यांनी जीएसटी विधेयकाला मंजुरी दिली आहे. नरेंद्र मोदी सरकारने जीएसटीला १ जुलैपासून लागू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाने १५ मे रोजी बोलावलेल्या अधिवेशनात त्यावर अंतिम शिक्कामोर्तब केले जाईल, असा विश्वास मंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी व्यक्त केला. जीएसटी लागू झाल्यानंतर राज्याच्या महसुलात वाढ होईल. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...