आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजयंता रणगाड्यांचा अंतही युद्ध कवायतीदरम्यान, पोखरणला रवानगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - १९७१ च्या पाकिस्तान युद्धादरम्यान शत्रूपक्षाला हैराण करून टाकणाऱ्या विजयंता रणगाड्यांची उपयोगिता अंतिम टप्प्यावरही तितकीच उपयुक्त सिद्ध झाली आहे. ७ वर्षांपूर्वीच हे रणगाडे युद्धभूमीवरून बाद झाले आहेत. मात्र, सैन्य अभ्यासासाठी आता ते पुन्हा सज्ज झाले आहेत. युद्धभूमीवर त्यांनी तोफगोळ्यांचा मारा केला होता. आता ते क्षेपणास्त्र झेलत आपली सहनशक्ती सिद्ध करतील. पोखरण येथे होणाऱ्या युद्धाभ्यासासाठी प्रथमच डमी टार्गेटऐवजी विजयंता रणगाड्यांचा उपयोग होत आहे.

सैन्यातील सशस्त्र युनिटद्वारे रणगाडे उडवण्याच्या क्षमतेचे परीक्षण करण्यात येईल. दिल्ली कँट आयुध डेपोमध्ये सध्या ३००-४०० विजयंता रणगाडे आहेत. पैकी २० रणगाडे युद्धाभ्यासासाठी वापरण्यात येतील. या रणगाड्यांविषयी अधिक माहिती सार्वजनिक करणे शक्य नसल्याचे संरक्षण प्रवक्ते मनीष आेझा यांनी सांगितले.

बॉम्ब आणि क्षेपणास्त्राच्या शक्तीचा कस
लष्कर आणि वायूदल शत्रूंचे रणगाडे उद्ध्वस्त करण्यासाठी बॉम्ब व क्षेपणास्त्रांचा मारा करतात. तो मारा असली रणगाड्यांवर झाला पाहिजे. त्यामुळे बॉम्ब व क्षेपणास्त्राचा कस लागतो. प्रत्येक युद्धाभ्यासानंतर याचा गोपनीय अहवाल तयार होतो. लष्करी मुख्यालयातून दर दोन वर्षांनी युद्धाभ्यासासाठी रणगाड्यांची मागणी होते.

दिल्ली शस्त्रागारात
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंदाजे १० महिन्यांपूर्वी दिल्ली कँट शस्त्रागाराला भेट दिली होती. तिथे शेकडो जुने रणगाडे त्यांनी पाहिले. १९६५ ते २००८ दरम्यान वापरलेल्या विजयंताविषयी त्यांनी जाणून घेतले. पैकी काही विजयंता टँकला आधुनिक करून त्याचा पुनर्वापर केला जातो. मात्र, बहुतांश रणगाडे उपयुक्त नाहीत. त्यानंतर स्वच्छ भारत अभियानांतर्गत या रणगाड्यांना नष्ट करावे, असे मत मोदींनी व्यक्त केले होते. त्यानंतर नोव्हेंबर २०१४ मध्ये लष्कराने काही टँक
लिलावासाठी काढले. काहींना वॉर ट्रॉफी म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला. २० रणगाडे पोखरणला युद्धाभ्यासासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला.
२००८ मध्ये सैन्यातून निवृत्त झाले विजयंता रणगाडे
४०० रणगाडे शस्त्रागारात आहेत
२०१४ मध्ये युद्धाभ्यासात वापरण्याचा निर्णय