आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या गावातील शाळकरी मुलांच्या बोर्ड परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी लग्नानंतर विधी टाळून ती माहेरी परतली...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - छत्तीसगडमध्ये सोमवारपासून ९ वी व ११ वीची वार्षिक परीक्षा सुरू होत आहे. १० वी व १२ वीच्या बोर्ड परीक्षा गेल्या आठवड्यात सुरू झाल्या. रायपूरपासून ४० किमी अंतरावर दुर्ग गावातील २५ वर्षीय पायल शर्मा मात्र आसपासच्या गावांतील मुलांच्या तयारीत सध्या गुंतली आहे.
  
५ फेब्रुवारी रोजी तिचे लग्न झाले. मात्र परीक्षा संपेपर्यंत मुलांची तयारी करून घेता यावी यासाठी तिने लग्नानंतरचे विधी टाळले आणि गावातच राहणे पसंत केले. यासाठी सासरच्या लोकांनीही तिला पाठिंबा दिला.
 
सासरे हरिश्चंद्र या संदर्भात म्हणाले, आजच्या काळात असे विचार मोठी बाब आहे. माझी सून चांगले काम करत आहे. आम्ही परीक्षेनंतर उर्वरित विधी पूर्ण करू. पायल बारावीला होती तेव्हापासूनच ती मुले आणि महिलांना घरी जाऊन शिकवत होती. त्या वेळी गावातील सरकारी शाळेत गणित व वाणिज्य विषयाचा शिक्षकच नाही हे तिच्या लक्षात आले.
 
 बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने शाळेत अध्यापन करण्यासाठी तत्कालीन प्राचार्य ज्योत्स्ना चंद्रवंशी यांच्याकडे विनंती केली. जानेवारी २०१० मध्ये तिला ही संधी मिळाली. पायल ७ वर्षांपासून विनावेतन शिकवत असल्याचे चंद्रवंशी यांनी सांगितले. पायलला सुरुवातीस ९ वी व १० वीचे गणित शिकवण्याची जबाबदारी दिली. यानंतर ११ वी व १२ वी इयत्तेचा वाणिज्य विषय दिला.  

पायलचे वडील विनोद म्हणाले, कुटुंबातील सदस्य लग्नाची तयारी करत होते तर पायल मुलांचा अभ्यास घेण्यात गर्क होती. अनेकदा धार्मिक विधी पूर्ण होताच शिकवण्यासाठी बाहेर पडत असे. लग्नाआधी काही दिवस मुलींनी घराबाहेर पडू नये अशी रीत आहे. त्यामुळे मोठ्या प्रयत्नानंतर मुलांनाच घरी बोलावून ती शिकवू लागली.  
 
शाळेच्या वेळापत्रकानुसार महाविद्यालयाची निवड  
पायलने शाळेच्या वेळेनुसार पुढील शिक्षणासाठी  महाविद्यालयाची निवड केली. ती सकाळी ७.०० ते ११.०० महाविद्यालयात जाते. १२.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत शाळेत शिकवते. यानंतर शाळेची वेळ बदलल्यानंतर तिने कॉलेज सोडले. घरीच अभ्यास सुरू केला. 
बातम्या आणखी आहेत...