आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायी पोहोचण्यासाठी लागत होते ५ ते ६ दिवस, आता एअर टॅक्सीने १७ मिनिटांचा प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठगोदाम - धार्लचुला येथील हेलिपॅड तळ. आपण बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशनवर करतो तसेच काही गावकरी आपले सामान घेऊन प्रतीक्षेत आहेत. सर्व आपापली तिकिटे घेऊन बसले आहेत. नवरात्रोत्सवात आपण चंदा दिल्यावर मिळणाऱ्या पावतीसारखे तिकीट. तसे येथे कोणतेही तिकीट कार्यालय नाही. हेलिकॉप्टर येण्यापूर्वी एक जण पावत्या घेऊन येतो. तोच तिकिटे देतो. तेवढ्यात हेलिकॉप्टरचा आवाज येतो आणि गावकरी सामान घेऊन तयार होतात. येथे प्रवासी नेण्यासाठी हेलिकॉप्टर आले आहे. ते कुट्टी गावाला जाईल. हेलिकॉप्टर लँड होताच लोक पळत सुटतात.
जवळपासच्या गावांत पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टर हेच एकमेव साधन आहे. येथे ना बसेस चालतात ना टॅक्सी. आधी पायी चालत गावात पोहोचण्यासाठी ५-६ दिवस लागायचे. खेचर आणि पोर्टरची मदत घ्यावी लागत असे. आता हा प्रवास हेलिकॉप्टरने १४ ते १७ मिनिटांवर आला आहे. जे बुजुर्ग आधी डोंगरावर वसलेल्या आपल्या कुलदैवतांच्या दर्शनाला जाऊ शकत नव्हते, त्यांना आता दरवर्षी तीही संधी मिळते आहे. येथे १२ कंपन्यांचे २४ हेलिकॉप्टर चालत आहेत. प्रत्येक कंपनीला हंगामात तीन ते चार कोटींचा नफा मिळतो आहे. मागच्या वर्षी एका फेरीचे भाडे २५०० रुपये होते. यावर्षी ते ४००० रुपये करण्यात आले आहे. तरीही प्रवाशांची संख्या वाढतच आहे. जे येथील रस्ते आणि डोंगर चढाईच्या धास्तीने आपल्या गावाकडे फिरकतही नव्हते तेही आता गावात येऊ लागले आहेत. प्रत्येक फ्लाइटला साधारणत: २ लाख रुपये खर्च येतो. सरकार त्याला सबसिडीही देते.
आयएएस राकेश शर्मा यांच्या मते, १९९१ मध्ये ते पिथौरगढचे जिल्हाधिकारी होते. कुट्टी गाव त्यांच्याच हद्दीत येत होते. पायी पोहोचायला ७ दिवस लागत. केदारनाथ संकटानंतर या गावांतही हेलिपॅड बनवण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला होता. उत्तराखंडच्या १२ जिल्ह्यांत ६० ठिकाणी हेलिपॅडसाठी निधी मिळाला आहे. १० कार्यरत आहेत.३५-४० चे काम सुरू आहे.
डोंगरावर वेगाचे वारे हेलिकॉप्टरवर धडकत असते. हवामान ५ मिनिटांतच बदलते. त्यामुळे जेवढे सर्व पायलट लष्कर किंवा हवाई दलातील निवृत्त पायलट आहेत, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचा हवाला देऊन लष्कर जेव्हा आपल्या हेलिकॉप्टरची उड्डाणे होऊ देत नाही, तेव्हा सायंकाळी उशिरापर्यंत ते गावकऱ्यांना घरांपर्यंत पोहोचवतात.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...