आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाममध्ये ८२ टक्के, बंगालमध्ये ८० % मतदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आसामच्या कोकराझालमध्ये महिलांनी वोटिंग बूथ बाहेर पारंपरिक डान्स केला. - Divya Marathi
आसामच्या कोकराझालमध्ये महिलांनी वोटिंग बूथ बाहेर पारंपरिक डान्स केला.
गुवाहाटी/कोलकाता - आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये सोमवारी विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अनुक्रमे ८२.२१ टक्के आणि ७९.५१ टक्के मतदान झाले. हिंसाचाराच्या काही तुरळक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली.

आसाममध्ये ६१ मतदारसंघांत दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान पार पडले. सोमवारी ५२५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. पहिल्या टप्प्याप्रमाणेच या टप्प्यातही मतदारांमध्ये प्रचंड उत्साह होता. अनेक मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्या होत्या. रांग लावण्यावरून सीआरपीएफ आणि ग्रामस्थ यांच्यात चकमक उडाली. या घटनेत ८० वर्षीय वृद्ध मतदाराचे निधन झाले. सीआरपीएफच्या सहायक कमांडंटसह तिघे जखमी झाले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये मिदनापूर, बांकुरा आणि बर्दवान जिल्ह्यातील ३१ मतदारसंघांत मतदान पार पडले. सोमवारच्या मतदानात १६३ उमेदवार रिंगणात होते. त्यात २१ महिलांचा समावेश होता. प्रमुख उमेदवारांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मानस भुनिया, राज्याचे मंत्री मलय घटक, अभिनेता सोहम चक्रवर्ती यांचा समावेश आहे. बर्दवान मतदारसंघातील काही केंद्रांवर हिंसाचाराच्या घटना घडल्या. तृणमूल काँग्रेस आणि माकपचे कार्यकर्ते यांच्यात झालेल्या चकमकीत माकपचा एक प्रतिनिधी जखमी झाला. जमुरिया येथे एका मतदान केंद्राजवळ बॉम्ब असलेल्या दोन पिशव्या आढळल्या.
पुढील स्लाइडवर पाहा, PHOTO