आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युपीमध्ये 11 वाजेपर्यंत 25% आणि मणिपूरमध्ये 45% मतदान, शनिवारी खुलणार पेटारे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आज 7 जिल्ह्यांतील 40 मतदारसंघात अखेरच्या टप्प्यातील मतदान होत आहे. या टप्प्यात एकूण 535 उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. त्यात जवळपास 22% गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत. या टप्प्यात एक कोटी 41 लाख मतदार हक्क बजावतील. मणिपूरमध्येही दुसऱ्या टप्प्यातील 22 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. युपीमध्ये 11 वाजेपर्यंत 25% आणि मणिपूरमध्ये 45% मतदान झाल्याचे वृत्त आहे. शनिवारी पाचही राज्यांतील निवडणुकांचे निकाल लागत आहेत. 

 

UPDATES 
- मणिपूरचे मुख्यमंत्री इबोबी सिंह यांनी सकाळी इंफाळमध्ये मतदान केले. यावेळी ते म्हणाले की, राज्यात काँग्रेसचा विजय निश्चित आहे. आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल. 
- मोदींनी ट्वीट करून मतदारांना मतदान करण्याची विनंती केली. उत्तर प्रदेशात आज अखेरच्या टप्प्यातील मतदान आहे. माझी विनंती आहे की, तुम्ही तुमचे मौल्यवान मत नक्की द्या. आदी मतदान, मग जलपान, असे मोदींनी पोस्ट केले.  
- मुरली मनोहर जोशींनी वाराणसी उत्तरमध्ये मतदान केले. 

देशातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तीने केले मतदान 
- वाराणसीमध्ये 121 वर्षांचे शिवानंद बाबा यांनी जीवनात प्रथमच मतदान केले. dainikbhaskar.com ला त्यांनी सांगितले की, ते देशातील व्यवस्थेवर नाराजा होते. त्यामुळे त्यांनी आजपर्यंत मतदान नाही केले. आता मोदींची प्रेरणा घेऊन मतदान केले. 

सकाळी 9 वाजेपर्यंतचे मतदान 
वाराणसी - 11.97%
चंदोली - 8% 
जौनपूर - 10.87%
मिर्झापूर - 11% 
गाझीपूर - 13% 
भदोही - 15.81%
सोनभद्र - 11%

या जिल्ह्यांत होत आहे मतदान 
- भदोही, चंदोली, गाजीपूर, जौनपूर, मिर्झापूर, सोनभद्र, वाराणसी. 

हेही जाणून घ्या.. 
- एकूण उमेदवार : 535
- एकूण पक्ष (राष्ट्रीय) : 6
- प्रादेशिक पक्ष : 4
- मान्यता नसलेले पक्ष : 77
- अपक्ष : 136
एकूण मतदार 
- एकूण मतदार : एक कोटी 41 लाख 39 हजार 697
- पुरुष : 76.62 लाख
- महिला : 64.76 लाख
- थर्ड जेंडर : 707

कोणत्या पक्षात किती डागाळलेले उमेदवार 
- एडीआरच्या रिपोर्टनुसार, एकूण उमेदवारांपैका 115 (सुमारे 22%) यांच्यावर फौजदारी गुन्हे आहेत. 95 उमेदवार (सुमारे 18%) उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. 
- सपाच्या 31 पैकी 19 (61%) डागाळलेले उमेदवार आहेत. कांग्रेसच्या 9 पैकी 5 (56%), बसपच्या 40 पैकी 17 (43%), बीजेपीच्या 31 पैकी 13 (42%) आणि अपक्ष 136 पैकी 18 (13%) गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. 

पुढे पाहा, संबंधित PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...