आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम बंगाल : तिसऱ्या टप्प्यात आज ६२ मतदारसंघांमध्ये मतदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान गुरुवारी होत आहे. राज्यातील ६२ मतदारसंघांत मतदान होणार असून त्यात कोलकात्यामधील सात मतदारसंघांचा समावेश आहे.

राज्यातील सुमारे १.३७ कोटी मतदार ४१८ उमेदवारांचे भवितव्य निश्चित करतील. त्यात ३४ महिला उमेदवारांचा समावेश आहे. मुर्शिदाबाद, नादिया, बर्दवान जिल्हा आणि उत्तर कोलकातामधील ६२ मतदारसंघांत गुरुवारी मतदान होईल. या टप्प्यात ज्या प्रमुख उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे त्यात तृणमूल काँग्रेसचे मंत्री साधन पांडे आणि शशी पांजा, भाजपचे राष्ट्रीय सचिव राहुल सिन्हा, काँग्रेसचे पाच वेळा निवडून आलेले आमदार मोहंमद सोहराब, माकपचे आमदार अनिसुर रहमान आणि निवृत्त आयपीएस अधिकारी नझरुल इस्लाम, माजी मंत्री हुमायून कबीर यांचा समावेश आहे. सर्व मतदारसंघांत तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आणि काँग्रेस युती तसेच भाजप या प्रमुख पक्षांचे उमेदवार मैदानात आहेत. मतदान प्रक्रियेसाठी सुमारे एक लाख सुरक्षा जवान तैनात आहेत. त्यात केंद्रीय दलांतील ७५ हजार जवान आहेत.
विद्यार्थ्यांना लॅपटॉप, सायकल देणार : यूडीएफ
तिरुअनंतपुरम | केरळमध्ये १६ मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने बुधवारी जाहीरनामा जारी केला. त्यात ‘सर्वांसाठी अन्न, निवारा आणि आरोग्य’ अशी प्रमुख घोषणा करण्यात आली आहे. सरकारी शाळा तसेच सरकारी मदत मिळणाऱ्या शाळांतील विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात लॅपटॉप, आठवीपर्यंतच्या विद्यार्थिनींना सायकल देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. आगामी दहा वर्षांत टप्प्याटप्प्याने राज्य दारूमुक्त करण्यात येईल, राज्यात पर्यटन,आरोग्य, समारंभ आणि वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्यात येईल,असे जाहीरनाम्यात म्हटले आहे. सेंद्रिय शेतीला अनुदान देण्याचे तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती काबूत ठेवण्यासाठी पावले उचलण्यात येतील.
पुढील स्‍लाइडवर वाचा, मुख्य सचिवांना हटवा : माकप