आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाराम नर्सला म्हणाला, तुम खुद मक्खन जैसी, बटर की क्या जरूरत है..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीहून तपासणीनंतर जोधपूरला परतलेल्या आसारामला एअरपोर्टमधून बाहेर येण्यासाठीही व्हीलचेअरची मदत घ्यावी लागली. त्याला उठताही येत नव्हते. त्यामुळे त्याला पोलिसांनी उचलून गाडीत बसवले. पोलिसांच्या गाडीत त्याला बसवताना चांगलाच त्रास पोलिसांनाही झाला.
अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात अटकेत असलेला आसाराम सध्या 80 वर्षांचा आहे. अगदी चालताही येत नाही एवढा तो आजारी आहे. पण त्याचे विचार अजूनही घाणेरडे असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. एम्समधील एका नर्सबरोबर बोलताना त्याने तिला छेडण्याचा प्रयत्न केल्याचे नर्सने दिलेल्या माहितीवरून समोर आले आहे.

आसारामने आयुर्वेदीक उपचारासाठी अंतरिम जामीन मिळण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने आसारामचा तपासणीसाठी एम्समध्ये नेण्यात आले होते. आसारामला विमानातून दिल्लीला नेताना विमानातील 70 पैकी 35 सीटवर आसारामचे समर्थक होते. ते फ्लाइट टेकऑफ झाल्यापासून लँडिंगपर्यंत गोंधळ घालत होते. आसाराम समर्थक विमानप्रवासादरम्यान अचानक उभे राहिल्याने विमान हवेत डोलायलाही लागले होते. एअर होस्टेसने समजावल्यानंतरही ते ऐकत नव्हते. अखेर पायलटच्या इशाऱ्यानंतर सगळे खाली बसले.

पुढील स्लाइड्सवर वाचा, नेमके काय म्हणाला आसाराम..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...