आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवऱ्याचा खून करून त्याला भिंतीत चिणणाऱ्या पत्नीस जन्मठेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - येथील न्यायालयात पतीचा खून करून मृतदेह भिंतीत चिणणांऱ्या पत्नीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. त्याचबरोबर या प्रकरणातील सहआरोपी असलेल्या प्रियकरास निर्दोष सोडण्यात आले. या प्रियकराच्या तपासात पोलिसांनी गंभीर चुका केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. 

न्यायालयाने संबंधित तपास अधिकारी आणि सहायक पोलिस अायुक्तांवर  कारवाईचे आदेश दिले आहेत. राजस्थानात चौमू पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या रामपुरा गावात राहणाऱ्या कालूराम कुंभार याचा सहा वर्षांपूर्वी खून झाला होता. 
 
याप्रकरणी पोलिसांनी त्याची पत्नी सावित्रीदेवी आणि मंगलचंद बुनकर, रा. राजावास यास अटक केली होती. मंगलचंद हा तिचा कथित प्रियकर होता. याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश तिरुपती गुप्ता यांनी सोमवारी यावर निर्णय दिला. सुनावणीच्या वेळी पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे प्रियकरावरील आरोप सिद्ध झाले नाहीत. यामुळे त्याला निर्दोष मुक्त केले.
 
सहायक सरकारी वकील महावीरसिंग यांनी सांगितले : सावित्रीदेवीने पश्चात्तापदग्ध होऊन खुनाची कबुली दिली होती.  
 
प्रियकर निर्दोष मुक्त होण्याची कारणे :   १. कोणत्याही साक्षीदाराने पत्नीचे आणि कथित प्रियकराचे अनैतिक संबंध होते, याला दुजोरा दिला नाही.  
बातम्या आणखी आहेत...