आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानमध्ये दारूची २८०० दुकाने होणार बंद, सर्वोच्च न्यायालयाच्या १५ डिसेंबरच्या आदेशाचा परिणाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- राजस्थानातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील सर्व २८०० दारूची दुकाने लवकरच बंद होणार असून सर्वोच्च न्यायालयाच्या गेल्या महिन्यातील आदेशावरून हे होत आहे.
 
राज्यात ७७६० दारूची दुकाने आहेत आणि त्यातील जवळपास २८०० दुकाने महामार्गावर वा त्यापासून ५०० मीटरच्या अंतराच्या आत आहेत. ती आता न्यायालयाच्या आदेशाने बंद होतील, अशी माहिती सीमा शुल्क आयुक्त ओ. पी. यादव यांनी दिली. 
सर्वोच्च न्यायालयाने असा आदेश गेल्या महिन्यात १५ डिसेंबर रोजी दिला होता. त्यानुसार राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील सर्व दारूची दुकाने बंद होतील. हा देशव्यापी आदेश आहे. यानुसार या दुकानांच्या परवान्यांचे ३१ मार्चनंतर नूतनीकरण होणार नाही. यामुळे सरकारचा ७००० कोटी रुपयांच्या महसुलावर मोठा परिणाम होणार अाहे, असे यादव म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे की, दरवर्षी रस्ते अपघातांत १.५ लाख लोक बाधित होतात. राजस्थानात अहवालानुसार २०१५ या वर्षी ८००० लोक रस्ते अपघातात मरण पावले व २२,००० लोक जखमी झाले होते.     
बातम्या आणखी आहेत...