Home »National »Other State» News About Without Time Is School Fees 19 Student Is Locked

शुल्क वेळेवर न भरल्यामुळे 19 विद्यार्थ्यांना कोंडले वर्गात, हैदराबादमध्ये खासगी शाळेतील घटना

वृत्तसंस्था | Mar 20, 2017, 03:09 AM IST

  • शुल्क वेळेवर न भरल्यामुळे 19 विद्यार्थ्यांना कोंडले वर्गात, हैदराबादमध्ये खासगी शाळेतील घटना
हैदराबाद-शाळेचे शुल्क वेळेवर भरण्यात पालक असमर्थ ठरल्याने शहरातील एका खासगी शाळेने १९ विद्यार्थ्यांना सुमारे एक तास वर्गात कोंडल्याचा संतापजनक प्रकार शनिवारी घडला. या मुलांपैकी काही जण तर फक्त पाच वर्षांचे आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हयातनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक जे. नरेंदर गौड यांनी सांगितले की, शालेय व्यवस्थापनाने या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा देण्यापासूनही रोखण्याचा प्रयत्न केला होता. ज्या मुलांना कोंडण्यात आले होते त्यात इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचाही समावेश होता.
पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर विद्यार्थ्यांना सोडण्यात आले आणि नंतर त्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली. डांबलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकाच्या पालकाने शालेय व्यवस्थापनाच्या विरोधात तक्रार नोंदवली. त्यानंतर भादंवि कलम ३४२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Next Article

Recommended