आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेश सरकार आदित्यनाथ यांच्यावर खटला चालवणार नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबाद- उत्तर प्रदेश सरकारने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर खटला चालवण्यास नकार दिला आहे. २००७ च्या गोरखपूर दंगलीच्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला याबाबत विचारणा केली होती. त्यावर राज्य सरकारने ही भूमिका घेतली.

या प्रकरणात मागील दोन्ही सरकारकडे फाईल गेली हाेती. त्यात योगी आदित्यनाथ यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी मागण्यात आली होती. याचिकाकर्ते गोरखपूरचे पत्रकार परवेज परवाज व सामाजिक कार्यकर्ते असद हयात यांच्या मते, या प्रकरणात आम्ही उच्च न्यायालयात खटला दाखल करू. तेथे दाद मिळाली नाही तर आणखी पुढे जावे लागेल. या प्रकरणात योगी आदित्यनाथ यांचे व्हाईस सॅम्पलही घेण्यात आले नव्हते. त्यामुळे विना चौकशी अशा प्रकारे सूट दिली जाऊ शकत नाही, असा तर्क त्यांनी मांडला आहे. प्रकरणाचा तपास सीआयडी ऐवजी सीबीआय किंवा इतर स्वतंत्र तपास यंत्रणेमार्फत केला जावा, अशी मागणी करणारी ही याचिका होती. 
बातम्या आणखी आहेत...