आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारुड्या नवऱ्यांमुळे त्रस्त महिलांना मदत; उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगींचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- दारुड्या नवऱ्यांमुळे त्रस्त महिलांना उत्तर प्रदेश सरकार मदत करणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी मध्यरात्री महिला आणि बालकल्याण विभागाच्या आढाव्यादरम्यान याबाबतचा निर्णय घेतला.
 
योगी म्हणाले, ज्यांचे पती दारुडे आहेत आणि उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्रोत नसलेल्या महिलांची सरकार मदत करेल. अशा महिलांची यादी तयार केली जाईल. त्यांना राणी लक्ष्मीबाई महिला आणि बाल सन्मान निधीतून मदत दिली जाईल. दुसरीकडे, राज्यातील सर्व विधवांना ‘निराश्रित महिला पेन्शन’ योजनेअंतर्गत आणले जाईल.
 
बातम्या आणखी आहेत...