चंदिगड - पंजाबच्या निवडणुकीत काँग्रेसने सोमवारी आपले घोषणापत्र जारी केले. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोमवारी पक्षाचे घोषणापत्र सर्वांपुढे ठेवले. याप्रसंगी राजिंदर भट्टलदेखील उपस्थित होते. या घोषणापत्राचा आराखडा राजिंदर भट्टल यांनीच तयार केला आहे. घोषणापत्रात युवक आणि शेतकऱ्यांच्या स्थितीवर अधिक लक्ष देण्यात आले आहे. पंजाबातील सर्वात मोठी समस्या ड्रग्जचा नायनाट करण्याची आहे यावर काँग्रेसने भर दिला. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे की, काँग्रेसचे सरकार राज्यात आल्यास ४ आठवड्यांतच राज्याला ड्रग्जमुक्त केले जाईल.
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सांगितले की, १० वर्षांपासून भाजप आणि अकाली दलाच्या सरकारात पंजाब फारच मागे पडला. अमरिंदर सिंगसारख्या कुशल नेत्याच्या नेतृत्वात या नुकसानीची भरपाई केली जाऊ शकेल. काँग्रेसने घराघरांत नोकरी, या योजनेअंतर्गत ९० लाख युवकांना रोजगार देण्याची घोषणा केली आहे.
नोटबंदीवर बोलले मनमोहन
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी नोटबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या नुकसानीचा मुद्दा उचलून धरला आणि केंद्रावर टीका केली. त्यांनी म्हटले की, नोटबंदी निवडणुकीवर परिणाम करेल. केंद्राच्या या पावलाने जीडीपीला धक्का बसेल.
पंजाबचे पाणी पंजाबसाठीच
दावा - पाण्यात ३० टक्के घट आली आहे. १०० हून अधिक ब्लॉक ड्रॉट झोनमध्ये आहेत. एसवायएलच्या रस्त्याने पंजाबचे पाणी सुरामध्ये दिले जाणार नाही.
ड्रग्जपुरवठा, वितरण ते विक्री ४ आठवड्यांतच समाप्त होईल.
दावा - ड्रग्ज घेणाऱ्या युवकांना नशेतून निघण्यासाठी ड्रगमाफिया आणि पोलिसांच्या युतीला ४ सप्ताहांतच संपविणार.