आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भाजपशासित राज्यांत दारूबंदी लागू करावी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खागरिया (बिहार) - देशात मद्यपान विरोधी वातावरण निर्माण व्हावे, असे वाटत असल्यास भाजप शासित राज्यांत दारूबंदी लागू करण्यात यावी, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. बिहारमधील दारूबंदीच्या कार्यक्रमाचे पंतप्रधानांनी तोंडभरून कौतूक केले. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. परंतु माझी त्यांना एक विनंती आहे. त्यांनी भाजप शासित राज्यांतून दारूबंदीचा निर्णय घ्यावा. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी १२ वर्षे राज्यात दारूबंदी लागू केली होती. म्हणूनच त्यांनी दारूबंदी बद्दलची जनजागृती निर्माण करण्यासाठी अशा राज्यांत दारूबंदीचा निर्णय लागू करावा, असे नितीश कुमार म्हणाले.