आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक घोषणेनंतरही सपात आझमखान यांचा समेटाचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव व त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांच्यातील समेटाची शक्यता जवळजवळ संपुष्टात आल्यासारखीच आहे. दोन्ही गटांच्या उमेदवारांची यादी यापूर्वीच जाहीर झाली आहे. दोन्ही याद्यांमध्ये जवळपास ५० असे विधानसभा जागा आहेत जिथे ते वेगवेगळा उमेदवार देतील म्हणजे एकमेकांविरुद्ध लढतील. जिथे वाद आहेत तिथे दोन्ही गट समाजवादी पक्षाचे (मुलायमसिंह) आणि समाजवादी पार्टी (अखिलेश) या नावांवर निवडणुकीत उतरतील, पण आता यक्षप्रश्न हा आहे की, सायकल हे निवडणूक चिन्ह आहे. निवडणूक आयोग सायकल निवडणूक चिन्हाला कोणत्या गटाला देते वा हे चिन्ह गोठविते हे पाहणे मनोरंजक असेल. हा निर्णय उत्तर प्रदेशच्या राजकारणात महत्त्वाचा आहे.
  
निवडणूक आयोगाच्या चिन्हाच्या निर्णयावर लक्ष  : याच दरम्यान निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त नसीम जैदी यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांकडून त्यांना निवेदने मिळाली आहेत. नियमांनुसार याची तपासणी करून पाहणी करून योग्य वेळी निर्णय जाहीर केला जाईल, आयोग साधारण नियमांतर्गत निर्धारित प्रक्रिया स्वीकारत याचे परीक्षण करत आहे. काय आपण सायकल हे निवडणूक चिन्ह रद्दच करणार आहात काय? यावर जैदी म्हणाले, सध्या तरी आमचे निरीक्षण सुरू आहे. योग्यवेळी निर्णय घेतला जाईल.
  
पण भाजपला हवी आहे एकजूट -सपा   : रोचक हे आहे की, सपातील कलहाला भाजपचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश माथूर यांनी सांगितले आहे की, सपा एकजुटीने राहिले तर चांगलेच आहे कारण त्यांना लढण्यासाठी सक्षम पक्ष हवाच आहे. गृहमंत्री राजनाथसिंह हे देखील बोलून गेले आहेत की, देशात कोणीही पिता-पुत्राच्या संघर्षावर आनंदी नसतील. आणि आम्हालाही आपल्या राजकीय विरोधकांच्या या परिस्थितीवर खुशी आनंद नाहीच, भाजप या कलहामधून आपला राजकीय विजय मिळवू इच्छित नाहीच.  काँग्रेसचे नेता आणि उत्तराखंड व उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल अजीज कुरेशी यांनीही सपा मधील कलहावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले आहे की, सपामधील संघर्षामुळे संपूर्ण देशातील धर्मनिरपेक्ष शक्तींना निराश केले आहे.  

समेटात प्रा. राम गोपाल यादवांचे अडथळे 
बुधवारी निवडणुकीच्या घोषणेनंतर सपाचे वरिष्ठ नेते मंत्री आजमखान यांनी समेट घडविण्याचे प्रयत्न अद्यापही सुरूच ठेवले आहेत. मुलायमसिंह यांच्या निवासस्थानी त्यांनी पाच तासांची दीर्घ बैठक घेतली. मुलायमसिंह यांच्या गटाने आता हे मान्य केले आहे की, समझोत्यात प्रा. राम गोपाल यादव हे अडथळे आणत आहेत.
 
 
बातम्या आणखी आहेत...