आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विपसना म्हणाली, 17 डेरे गुरमीत राम रहीम यांचेच, डेरा सोडणार नाही; 45 सदस्यांची चौकशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिरसा- डेरा सच्चा सौदापासून १७ डेरे वेगळे करण्याच्या याचिकेवर गुरुवारी उच्च न्यायालयाकडून नियुक्त करण्यात आलेले कोर्ट कमिशनर ए. के.एस. पवार यांनी सिरसा येथे जाऊन दोन्ही बाजूंची चौकशी केली. मिनी सचिवालयाच्या मीटिंग हॉलमध्ये दोन्ही बाजूंच्या लाेकांना बोलावले होते. चौकशी दरम्यान, व्यवस्थापक विपसना इन्सा हिने कोर्ट कमिशनरसमोर दावा केला की, जे १७ डेरे सच्चा सौदापासून वेगळे असल्याचे सांगितले जाते, ते प्रत्यक्षात डेरा सच्चा सौदाचाच भाग आहेत. 

यानंतर माध्यमाशी बोलताना विपसना इन्सा हिने सांगितले, मी कोर्ट कमिशनरसमोर आमची बाजू मांडली. तसेच अापण डेरा सोडून कोठेही जाणार नाही, असेही तिने निक्षून सांगितले. डेरा सच्चा सौदाच्या गादीवरून डेरा प्रमुख राम रहीम याचा मुलगा जसमीत इन्सा याच्या वक्तव्याचे समर्थन करताना ती म्हणाली, गुरू गादीवर गुरमीत राम रहीम कायम असतील. 

अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात ती म्हणाली, प्रकृती ठीक नसल्याने मी पंचकुलाच्या एसआयटीसमक्ष हजर झाले नव्हते. परंतु आता एसआयटीसमोर जाणार आहे. दरम्यान, कोर्ट कमिशनर पवार यांनी सांगितले, १७ डेऱ्यांकडून याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्याची पडताळणी करण्यात येत आहे. उच्च न्यायालयाकडून उपस्थित करण्यात आलेल्या चार प्रश्नांची उत्तरे प्रमुख डेरा व इतर १७ डेऱ्यांना विचारली. 
 
चौकशीदरम्यान मुख्य डेराची व्यवस्थापक विपसना इन्सा, उपव्यवस्थापक डाॅ. पी. आर. नैन, डेरा व्यवस्थापन समितीचे इतर प्रमुख सदस्य व १७ डेऱ्यांचे संबंधित व्यवस्थापक हजर होते. जसमीत व कुटुंबिय डेरात आल्यानंतर विपसना प्रथमच पत्रकारांशी बोलली. 
 
पुढील स्‍लाईडवर वाचा, हनीप्रीतची भाऊ आणि वहिनीशी २० मिनिटे भेट ...
बातम्या आणखी आहेत...