आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली-/पणजी- गोव्यात सुरु असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला आजारपणामुळे गैरहजर राहणारे पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवानींच्या घरासमोर हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.
गोव्यात सुरु असलेल्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची येत्या निवडणुकीत प्रचारसमितीच्या प्रमुखपदी निवड केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाराज असलेल्या अडवानी यांनी पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला 'दांडी' मारल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी अडवानींच्या घराबाहेर त्यांच्याविरोधात निदर्शने तर, मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी दिल्या.
मनोहर पर्रीकरांची बॅटिंग : निवडणुकांसाठी नरेंद्र मोदींकडे नेतृत्त्व सोपवा
पुढील काळात विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका पाहता गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पक्षाचे नेतृत्त्व सोपवावे व भाजपचा चेहरा म्हणून मोदींची ओळख तयार केली जावी, असे मत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केले आहे.
भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक गोव्यात आयोजित करण्यामागे पर्रीकर यांचा मोठा सहभाग आहे. ही बैठक मागील महिन्यात मध्यप्रदेशमध्ये होणार होती. मात्र पक्षात अडवानींना साईटलाईन करुन मोदींचे नेतृत्त्व पुढे आणण्याचे प्रयत्न सुरु होताच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी कार्यकारिणी बैठकीची व्यवस्था तत्काळ करता येणार नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर ही बैठक काही काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोदींसाठी आग्रही असलेले पर्रीकर यांनी आपण गोव्यात बैठक आयोजित करु असे राजनाथ व मोदींना सांगितले होते. त्यानुसार ही बैठक होत आहे. त्यामुळे पर्रीकर गोव्यात मोदींच्या बाजूने जोरदार बॅटिंग करीत आहेत.
मोदी यांच्या बाजूने पक्ष हळू-हळू झुकू लागला असून, त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. यात राजस्थानच्या वसुंधरा राजे, नितीन गडकरी, मनोहर पर्रीकर यांच्यासह अनेक तरुण नेत्यांचा पाठिंबा मिळत आहे. मुख्यमंत्री चौहान व रमणसिंग यांनी मोदींबाबत थांबा आणि पाहा हेच धोरण अंवलबले आहे. चौहान हे तर अडवानी गटाचे उघड आहे. तरीही त्यांनी मोदींच्याबाबत भाष्य करण्याचे हुशारीने टाळले आहे.
पुढे वाचा, काय चाललयं भाजप पक्षात व का वाढतोय अंतर्गत कलह.. क्लिक करा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.