आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहार निवडणूक : राजकारणात सक्रियतेसाठी विद्यार्थी नेत्यांचा ‘राजकीय वर्ग’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच एरवी राजकीय व्हेंटिलेटरवर असलेल्या विद्यार्थी नेत्यांचे कान टवकारले आहेत. त्यांनाही आता राजकारणात सक्रिय होण्याचे वेध लागले आहेत. म्हणूनच आगामी निवडणूक त्यांच्यासाठी ‘पॉलिटिकल क्लास’पेक्षा कमी नाही.
राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी ही मंडळी धडपड करत आहेत. त्यांनी आपल्या ज्येष्ठ नेत्यांकडे तगादा लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच २४३ मतदारसंघात तरुण विद्यार्थी नेते चमकण्यासाठी उत्सुक झाले आहेत. परंतु विद्यार्थी नेत्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यात यश मिळो न मिळो, गेल्या वेळी जदयूने १४१ जागी आपले उमेदवार केले होते. यंदा त्यांचे १०० जागी उमेदवार उभे असतील. त्यापैकी ४१ उमेदवारांना पुन्हा संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही संख्या वाढू शकते. अर्थात, नवीन चेहऱ्यांना संधी अपेक्षित आहे. जदयू विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रंजनकुमार अस्थावा मतदारसंघातून इच्छुक आहेत. राजदमध्येही कमीअधिक अशीच स्थिती दिसते. राजद विद्यार्थी नेते अजित यादव इच्छूक आहेत.

फ्लेक्स प्रसिद्धीला चाप
निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून बिहारमध्ये वाहनांवर विविध पक्षांचे फ्लेक्स दिसून येत आहेत. वास्तविक ही गोष्ट वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारी आहे. परंतु बिहारींना त्याचे काय? मिळेल त्या गाडीवर पक्षाचा प्रचार करणारे फ्लेक्स पाहायला मिळत होते. म्हणूनच आता प्रशासनाने पोलिसांना अशा वाहनांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुरुवारी त्याची अंमलबजावणी झाली.