आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचंदीगड- 'माझे थोरले बंधु नरेंद्र मोदी यांच्याकडून लहानपणी खूप मार खाल्ला होता. आम्ही सोबतच लहानाचे मोठे झालो. अभ्यासही सोबतच केला, परंतु 1970 मध्ये मोदी कुटूंबापासून विभक्त झाले. 12 वर्षांपासून आम्ही एकमेकांना भेटलेलो नाही' असा खुलासा गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींचे लहान भाऊ प्रल्हाद मोदी यांनी केला आहे.
रेशन डेपो होल्डर्सच्या परिषदेला उपस्थित झालेले प्रल्हाद मोदी म्हणाले, नरेंद्र मोदी हे माझे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले. आम्ही पाच भावंडे आणि एक बहीण आहेत. नरेंद्र मोदी हे तिसर्या क्रमाकांचे भाऊ. सगळ्यात थोरले बंधु सरकारी कर्मचारी होते. सेवानिवृत्तीनंतर ते वृद्धाश्रम चालवत आहेत. दुसरे बंधु व्यवसाय करताहेत तर सगळ्यात लहान भाऊ सध्या सरकारी नोकरीवर आहे. आमच्या कुटूंबातील नरेंद्र मोदी हेच एकमेव राजकारणात आहे.
पुढील स्लाईड्सवर वाचा, 'मोदींनी मुस्लिम मित्रांना हज यात्रेला पाठवले'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.