आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LIVE: वसुंधरा राजे 13 डिसेंबरला घेणार मुख्‍यमंत्रीपदाची शपथ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- मतमोजणीच्‍या पहिल्‍या अर्ध्‍या तासांत कॉंग्रेस आणि भाजपमध्‍ये काट्याची लढत दिसून येत होती. पण कालांतराने भाजपने कॉंग्रेसवर मोठी आघाडी घेतली. ताज्‍या निकालांनुसार भाजपने राजस्‍थानमध्‍ये प्रचंड बहुमताने सत्ता हस्‍तगत केली आहे. राज्‍यात कॉंग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. पक्षाचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रभान यांनी पराभवाची जबाबदारी स्‍वीकारून पदाचा राजीनामा दिला आहे. वसुंधरा राजे 13 डिसेंबरला घेणार मुख्‍यमंत्रीपदाची शपथ. पूर्वीच्‍या कार्यकाळातही तिथेच शपथविधी पार पडला होता.


राज्‍यात भाजप कार्यकर्त्‍यांनी जल्‍लोष करण्‍यास सुरूवात केली आहे. दुसरीकडे विद्यमान मुख्‍यमंत्री अशोक गेहलोत यांनीही पराभव स्‍वीकारला आहे. त्‍यांनी राजस्‍थानमधील पराभवास युपीए सरकारच्‍या धोरणास जबाबदार ठरवले आहे. वसुंधरा राजे यांनी पक्षाच्‍या विजयाचे श्रेय नरेंद्र मोदी यांना दिले आहे. वसुंधरा यांनी झालरापाटन मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे.

दुसरीकडे वसुंधरा राजे यांनी विजयाचे श्रेय जनतेला दिले आहे. झालरापाटन मतदारसंघातून वसुंधराराजे सिंधिया यांनी कॉंग्रेसच्‍या उमेदवार मीनाक्षी यांचा पराभव केला.

राजस्‍थानच्‍या संभाव्‍य मुख्‍यमंत्री वसुंधरा राजे यांनी राज्‍यातील विजयाचे श्रेय जनतेला समर्पित केले आहे. आपला जनतेवर पूर्वीपासून विश्‍वास होता, असे त्‍यांनी म्‍हटले.

राजस्‍थानमधील 199 जागांसाठी मत मोजणी सुरू असून ती दुपारपर्यंत संपेल आणि सर्व निकाल समोर येतील. राजस्‍थानमध्‍ये यावेळी 74.38 टक्‍के पेक्षा जास्‍त मतदान झाले. गेल्‍या विधानसभा निवडणूकीत राज्‍यात 66.41 टक्‍के मतदान झाले होते. तर वर्ष 2003मध्‍ये 67.04 टक्‍के मतदान झाले होते. राजस्‍थानमध्‍ये 199 जागांवर 2096 उमेदवार नशीब आजमावत आहे. राजस्‍थानमध्‍ये एकूण 200 जागा असून बसपा उमेदवाराच्‍या मृत्‍यूमुळे एका जागेवर निवडणूक झाली नाही.  राजस्‍थानमध्‍ये भारतीय जनता पक्षाने जबरदस्‍त मुसंडी मारली असून सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाला पराभवाची चव चाखावी लागणार आहे.नरेंद्र मोदींनी राजस्‍थानमधील भाजपच्‍या विजयानिमित्त वसुंधरा राजे यांना दिल्‍या शुभेच्‍छा
पुष्‍कर येथून भाजपचे सुरेश रावत विजयी
अजमेर उत्तरमधून भाजपचे वासुदेव देवनानी विजयी
कॉंग्रेसमध्‍ये निराशजनक वातावरण. भाजपमध्‍ये विजयाचा जल्‍लोष
पिंडवाडा आबूतून भाजपचे सामाराम गरसिया विजयी
भाजप उमेदवार नरपत सिंह राज्‍वी विद्याधर नगरमधून विजयी
भाजप उमेदवार मदन राठोड सुमेरपूर मतदारसंघातून विजयी. मंत्री बीना काक पराभूत
बगरू मतदारसंघातून भाजपचे कैलाश वर्मा विजयी
सार्दुलशहरातून भाजपचे जगदीश चंद्र जांगिड विजयी
राजस्‍थानचे मुख्‍यमंत्री अशोक गेहलोत यांनी पराभव मान्‍य केला.
सीकर मतदारसंघात \'नोटा\'ला सर्वात जास्‍त मतदान. मतदारांनी नाकारले उमेदवारांना.
झालरपाटन मतदार संघातून वसुंधरा राजे सात हजार मतांनी आघाडीवर
अशोक गेहलोत प्रतिस्‍पधी उमेदवारापेक्षा सात हजार आघाडींनी
सादुलपूर मतदारसंघातून कृष्‍णा पुनिया पिछाडीवर
महुवातून गोलमा देवी पिछाडीवर
बिकानेरमधून भाजप पाच जागांवर आघाडीवर
आसिंद मतदारसंघातून कॉंग्रेसचे रामलाल जाट आघाडीवर
सवाई माधोपूर मतदारसंघातून भाजपच्‍या दीया कुमारे पुढे
राजस्‍थानमध्‍ये सर्वात जास्‍त मतदार झोटवाडा येथे (2,92,549) तर सर्वात कमी बसेडीमध्‍ये (एससी) (1,49,361)
राजस्‍थानमध्‍ये भाजपला बहुमत मिळण्‍याची शक्‍यता
ओसिया मतदारसंघातून लीला मदेरणा आघाडीवर. पती महिपाल मदेरणा तुरूंगात

 

पक्षनिहाय संख्‍याबळ

भाजपा 162, कॉंग्रेस 21, बसपा 3, आरजेपी 4 आणि इतर 9