आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे नव्हते, कापून छोट्या केलेल्या बॅटने खेळली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड- हरमेंद्रसिंग चांगली जाडजूड बॅट कापून लहान करत होते. कारण त्यांच्या ५ वर्षे वयाच्या लहान मुलीसाठी बॅट घ्यायलाही त्यांच्याकडे पैसे नव्हते. ते कारकून होते, परंतु मुलीचे स्वप्न त्यांना पूर्ण करायचे होते. अडचणी खूप होत्या, आणि मुलीला खेळ शिकायचा होता. तिचीसुद्धा जिद्द तशीच होती.
  
आता ऑस्ट्रेलियाकडून वुमन बिग बॅश लीगमधील २७ वर्षे वयाच्या भारतीय क्रिकेटर हरमनप्रीत कौरची ही कथा. ती भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू आणि बिग बॅश लीगमध्ये खेळणारी पहिली भारतीय महिला आहे. ती भारतीय महिला क्रिकेट संघाचे कप्तानपद भूषवले आहे. मोगाजवळील दुनेके या छोट्या गावची ती रहिवासी. तिच्यासोबत खेळण्यासाठी कोणी मुली नसायच्या. तेव्हा हरमन मुलांसोबत खेळायची. त्यांच्याबरोबरीने तिला खेळात प्रावीण्य मिळवले. 

हरमेंद्रसिंग सांगतात, तीन भावंडांमध्ये हरमनप्रीत सर्वात मोठी. तिची कथा देशातील इतर खेळाडंूपेक्षा खूप वेगळी आहे. तिला क्रिकेट खेळण्यास पोषक असे वातावरणही मिळाले नाही अन् सहकारीही नव्हते. मुलांसाेबत गल्लीत क्रिकेट खेळत असे. या वातावरणात शिव्या देणे म्हणजे मामुली गोष्ट होती. मी तिला यापासून रोखले नाही. कान बंद ठेवून बॅटिंग कर, असे सांगितले. हरमन थांबलीच नाही. उंचीपेक्षाही जास्त लांबीच्या बॅट्सने फटके द्यायची. ती घरात मोठी असल्याने आईचा खेळास विरोध असायचा. परंतु मी कधी तिला रोखले नाही. हरमनचे शिक्षक क्रिकेटच्या वेडामुळे मला चार गोष्टी सुनावत असत. त्यानंतरही आम्ही तिला रोखले नाही. हरमेंद्रसिंग म्हणाले, तिचा जन्म झाला तेव्हा आम्ही तिला जो टी शर्ट घातला त्यावर ‘गुड बॅटिंग’ असे लिहिलेले होते. तो टी शर्ट अजूनही आम्ही सांभाळून ठेवला आहे. तिची हीच गुड बॅटिंग एक दिवस बेस्ट बॅट्स वुमन म्हटली जाईल याचा आम्ही विचारही केला नव्हता. हरमनच्या  आयुष्यात टी शर्टचे अनेक किस्से घडले आहेत. दंगलीतील अत्याचारग्रस्तांना श्रद्धांजली म्हणून ती नेहमी ८४ क्रमांकाचा टीम इंडियाचा टी शर्ट वापरते.

तिच्या क्रिकेटच्या वेडामुळे अनेकांनी तिला खेळाडूंची नावे असलेले टी शर्ट््स भेट म्हणून दिले. परंतु ते तिने कधी वापरले नाहीत. कारण स्वत:चे नाव असलेली टीम इंडियाची जर्सी घालण्याची तिची जिद्द होती. त्या वेळी हरमनचे वय होते १५ वर्षे.  कमलदीशसिंग सोढी मोगा येथे प्रीमियर क्रिकेट अकादमी चालवत होते. नेहमी उत्तम क्रिकेटपटूंच्या ते कायम शोधात असत.
  
एका मुलीने त्यांचे लक्ष वेधून घेतले. या मुलीने गुरू नानक कॉलेजच्या मुलांना धूळ चारली हाेती. मोठे फटके लगावत होती. त्यांनी तत्काळ हरमनला त्यांच्या अकादमीत दाखल करून घेतले. याआधी त्यांच्याकडे कोणत्याही मुलीने क्रिकेटचे प्रशिक्षण घेतलेले नव्हते. त्यांनीच हरमनची ट्यूशन फी व अकादमीची फी भरली. सोढी यांनी तिला क्रिकेटची किट दिली. बूट दिले. मग काय, तिला मनापासून खेळण्याची संधी मिळाली.
  
सोढी सरांकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर हरमनला फिरोजपूर येथील एस. के. पब्लिक स्कूलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे संघात निवड होण्यासाठी कठीण स्पर्धा होती. वडिलांनी सांगितले, केवळ खेळाकडेच लक्ष दे. अभ्यासाचा विचार करू नकोस. हरमनने तसेच केले. संघात तिची निवड झाली. एका शाळेच्या संघात सहभागी झाल्यानंतर पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या कॅम्पमध्ये तिला स्थान मिळाले. 

ऑलराउंडर असल्याने तिची फिरोजपूर संघात निवड झाली. दोन वर्षे प्रशिक्षण घेतल्यानंतर तिला पंजाब सीनियर संघात निवडण्यात आले. १८ व्या वर्षी ती अंडर १९ च्या संघात खेळली.   त्यानंतर ती नॉर्थ झोन संघाकडून खेळली. चॅलेंजर्स ट्रॉफीनंतर ती थेट एनसीएमध्ये दाखल झाली. तेथे टीम इंडियाच्या संभाव्य खेळाडूत तिची निवड झाली.
बातम्या आणखी आहेत...