आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती-पंतप्रधानांसोबत परदेश दौरे करणारा दैनिकाचा संपादक निघाला कर्मचार्‍यांचा हत्यारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आगरतळा - येथील दैनिक गणदूतचे संपादक सुशील चौधरी यांना त्यांच्या वृत्तपत्रातील तीन जणांच्या हत्येच्या आरोपात दोषी ठरविण्यात आले आहे. 17 जुलै रोजी त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे. फाशी किंवा अजन्म कारावासीची शिक्षा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चौधरीने त्याच्याच संस्थेत कार्यरत असलेला प्रुफ रिडर, व्यवस्थापक आणि चालकाचा खून केला असल्याचे कोर्टात सिद्ध झाले आहे. मागील वर्षी त्याने हे तीन खून केले होते. चौधरी शहरातील एक प्रतिष्ठीत व्यक्ती म्हणून सर्वांना परिचित आहे. विविध राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसोबत परदेश दौर्‍यावर देखील तो गेला होता.
भुखंडाच्या दलालीतून झाली हत्या
अवैध भुखंड आणि त्याच्या दलालीतून या हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, चौधरी जमीनींचे अवैध व्यवहार करत होता. याची माहिती व्यवस्थापक रणजीत चौधरीला मिळाल्यानंतर त्याने संपादक चौधरीचा बुरखा फाडण्याची धमकी दिली. तर चौधरीने चालकाच्या मदतीने व्यवस्थापकाचा खून केला. प्रुफ रिडर सुजीत भट्टाचार्य याने खून होताना पाहिले होते. त्यानंतर चालक आणि प्रुफ रिडर यांच्यात हाणामारी झाली. यात दोघांनी एकमेकांवर चाकूने वार केले. त्यातच दोघांचा मृत्यू झाला. या तिघांचे मृतदेह संपादक चौधरीच्या कार्यालयात सापडले होते. त्यांच्यावर चाकूने वार केलेले होते.
पोलिसांची केली दिशाभूल
सुशील चौधरीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. तपासा दरम्यान त्याने सांगितले, की मी ओरडण्याचा आवाज ऐकला पण मला वाटले टीव्हीवर कार्यक्रम सुरु असेल. चौधरीने कर्मचार्‍यांच्या मारेकर्‍यांना पकडून देणार्‍यांना 10 लाखांच्या बक्षीसाची घोषणा केली होती.
चालकाच्या पत्नीने केला हत्याकांडाचा खुलासा
व्यवस्थापकाला मारणार्‍या चालकाची पत्नी नियती घोष त्यावेळी तिथेच उपस्थित होती. ती माफीची साक्षीदार झाली आणि तिने पोलिसांना सत्य घटना सांगितली. त्यानंतर चौधरीला अटक करण्यात आली.