निकी सुमी NSCN च्या सशस्त्र युनिटचा कमांडर आहे. खापलांग संघटनेचा तो प्रमुख आहे. NIA ने यासंदर्भातील जाहीर सुचना प्रसिद्ध केली आहे. या दोन्ही दहशतवाद्यांच्या अटकेसाठी माहिती देणा-याचे नाव आणि माहिती गुपीत ठेवण्यात येईल, असेही राष्ट्रीय तपास संस्थेने म्हटले आहे.
4 जूनचा हल्ला
मणिपूरमध्ये 4 जून 201 5 रोजी भारतीय लष्कारच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी जोरदार हल्ला चढविला होता. त्यात 18 जवान शहीद, तर 11 जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी वेगवेगळ्या मार्गाने म्यानमारच्या दिशेने कूच केले.
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा, NIA ने प्रसिद्ध केलेली सुचना...