आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरात बीफ फेकून दंगली घडवणार होते हैदराबादेत पकडलेले IS चे संशयित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एनआयएच्या पथकाने 5 जणांना अटक केली, तर 6 जणांना ताब्यात घेतले. - Divya Marathi
एनआयएच्या पथकाने 5 जणांना अटक केली, तर 6 जणांना ताब्यात घेतले.
हैदराबाद- राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) जुन्या हैदराबादेत 10 ठिकाणी धाडी टाकून 5 जणांना अटक केली आणि 6 जणांना ताब्यात घेतले. रमजान दरम्यान दंगली घडवण्याचा त्यांचा इरादा असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी ते शहरातील भाग्यलक्ष्मी मंदिरात बीफ फेकण्याची योजना तयार करत होते. त्यांची व्हीव्हीआयपी व्यक्तींवरही हल्ल्याची तयारी होती. या धाडसत्रातून इसिसचे संशयित मॉड्यूल उद‌्ध्वस्त केल्याचा दावा एनआयएने केला आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये 6 भाऊ आणि 2 कॉम्प्यूटर इंजिनियर आहे. त्यांचे फोन कॉल ट्रेस केल्यानंतर एक जण म्हणत होता, 'काम यशस्वी करण्यासाठी आम्ही तयार आहोत.'

आणखी काय खुलासा झाला...
- एका मीडिया रिपोर्टनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांनी चौकशीत सांगितले, की व्हीव्हीआयपी देखील निशाण्यावर होते. त्यासाठी शक्तीशाली बॉम्ब तयार करत होतो.
- हैदराबादमधील प्रसिद्ध भाग्यलक्ष्मी मंदिरात बीफ फेकून सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचे त्यांचे षडयंत्र होते. दंगली घडवून आणण्यासाठी ते असे षडयंत्र रचत होते.
- चौकशीत समोर आले आहे, की हे काम सध्या सुरु असलेल्या रमजान दरम्यानच केले जाणार होते. एनआयएने हे षडयंत्र वेळीच उद्धवस्त केले आहे.

धाडीत काय-काय मिळाले
- धाडीत शस्त्रे, स्फोटके, युरिया, अॅसिड, रसायने, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, काही संवेदनशील सामग्री आणि 15 लाख रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आले.
- ताब्यात घेण्यात आलेले 11 संशयित तरुण इसिससाठी काम करत होते.
- स्थानिक पोलिसांच्या मदतीने एनआयएने जुन्या हैदराबाद शहरात धाडी टाकल्या. संशयितांचा हैदराबादेत घातपाताचा कट होता, असे एका गुप्तचर अधिकाऱ्याने सांगितले.
- शहरातील काही तरुण भारताविरुद्ध युद्ध छेडण्याच्या कटात सहभागी झाले आहेत. घातपातासाठी त्यांनी शस्त्रे आणि स्फोटके हस्तगत केली असल्याची माहिती मिळाल्यानंतर एनआयने ही कारवाई केली.
- एनआयएच्या पथकाने 5 जणांना अटक केली, तर 6 जणांना ताब्यात घेतले.
भाजपचा आरोप
हैदराबादशहर दहशतवाद्यांसाठी ‘सुरक्षित स्वर्ग’ होत आहे. तेलंगण सरकार त्याकडे डोळेझाक करत आहे, असा आरोप भाजपने केला आहे. भाजपच्या राज्य शाखेचे प्रवक्ता कृष्णा सागर राव म्हणाले की, एनआयएने इसिसचे मोड्युल उद्ध्वस्त केले आहे. सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...