आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NIA Officer Tanzeem Shot Dead By Unidentified Gunmen In Bijnor

बाबा मरेपर्यंत हल्‍लेखोरांनी झाडल्‍या गोळ्या, तंजील यांच्‍या मुलांनी दिली माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिजनौर/नवी दिल्ली - राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए)उपअधीक्षक मोहंमद तंजील अहमद यांची उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये अज्ञात दुचाकीस्वारांनी २४ गोळ्या झाडून हत्या केली. अत्‍यंत गंभीर अवस्‍थेतही तंजील यांनी मुलांचा जीव वाचवला. त्यांची पत्नी फरजाना यांनाही चार गोळ्या लागल्या असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. हल्ल्यात सुदैवाने त्यांची दोन्ही मुले सुरक्षित बचावली. एनआयएने हा सुनियोजित कट असल्याचे म्हटले आहे, तर हा अतिरेकी हल्ला असल्याचा यूपी पोलिसांना संशय आहे.
काय म्‍हणाली मुले..
- त्‍याचे मुलं शहबाज आणि जिमनीश म्‍हणाले, '' मागून दोन लोकांनी फायरिंग केली. बाबांनी आम्‍हाला मागच्‍या सीटखाली लपवले. गोळ्या संपल्‍यानंतर त्‍यांनी रीलोड करून पुन्‍हा गोळ्या मारल्‍या. तोपर्यंत पापा जिवंत नव्‍हते.''
- तंजील यांचे भाऊ रागीब अहमद म्‍हणाले, '' या घटनेनंतर आम्‍ही पोलिस ठाण्‍यात गेलो. मात्र आम्‍हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.''
- ''आमच्‍या नातेवाईकांनी तेथे जाऊन नारेबाजी केली तेव्‍हा पोलिस अॅक्टिव्‍ह झाले.''
- तंजील यांची मुलगी म्‍हणाली, '' परिसरातून कोणीही मदतीसाठी आले नाही. पोलिसही नाही. मागून काका कारने आले. त्‍यांनी आईला हॉस्‍पिटलमध्‍ये नेले.''

शनिवारी मध्यरात्री १२.४५ वाजता हा हल्ला झाला. ४५ वर्षीय तंजील अहमद स्योहारा गावातून भाचीचे लग्न लावून पत्नी व दोन मुले जिमनिश (१४) व शाहबाजसोबत (१२) वॅॅगन आर कारने आपल्या सहसपूर गावाकडे परतत होते. त्यांचे घर घटनास्थळापासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर होते. त्यांच्या मुलांनुसार, अचानक एका दुचाकीस्वाराने कारसमोर दुचाकी आडवी लावली. एक जणाने खाली उतरून स्वयंचालित बंदुकीने तंजील अहमद यांच्यावर गोळ्या झाडल्या. सीटखाली लपल्याने मुले सुरक्षित बचावली. पण तंजील अहमद यांचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टेम करणाऱ्या डॉक्टरांनुसार त्यांना किमान २४ गोळ्या लागल्या आहेत. इंडियन मुजाहिदीनशी संबंधित अनेक प्रकरणांत त्यांनी तपास केला होता.

पाक जेआयटीशी संवाद
तंजील अहमद २ जानेवारीला पठाणकोट हल्ल्याच्या तपास पथकात होते. तपासासाठी आलेल्या पाकिस्तानी संयुक्त तपास पथकाशी चर्चा करणाऱ्या टीममध्येही ते होते. २ ऑक्टोबर २०१४ ला वर्धमानमधील (प. बंगाल) एका घरातील स्फोटाच्या तपास पथकात ते होते.
हल्‍लेखोरांनी घातल्‍या 24 गोळ्या..
- तंजील हे राष्ट्रीय तपास संस्थेत (एनआयए) उपअधीक्षक होते.
- ते पत्‍नी फरजाना आणि दोन मुलांसोबर रात्री घरी परतत होते.
- पूर्ण कुटुंबासोबत ते एका लग्‍नसोहळ्यात सहभागी होते.
- स्योहारा पोलिस स्‍टेशनच्‍या हद्दीत एका पुलावर त्‍यांच्‍यावर हल्‍ला झाला.
- दुचाकीवरुन आलेल्‍या हल्‍लेखोरांनी त्‍यांच्‍या कारवर गोळीबार केला.
- दरम्‍यान तंजील यांच्‍यावर 21 गोळ्या झाडण्‍यात आल्‍याची माहिती आहे.
- हॉस्पिटलकडे घेऊन जातानाच तंजील यांची प्राणज्‍योत मालवली.
- त्‍यांच्‍या पत्‍नीवर नोएडा येथील हॉस्पिटल उपचार सुरू आहे.
- त्‍यांनाही चार गोळ्या लागल्‍या आहेत.
- पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
- त्‍यांच्‍यावर हल्‍ला का केला हे अजून स्‍पष्‍ट झाले नाही.
पठाणकोट हल्‍ल्याशी असा आहे संबंध..
- तंजील हे एआयएमध्ये नियुक्तीवर आले होते अशी माहिती आहे.
- ते कोर ऑपरेशन टीमशी संबंधित होते.
- देशातील लहान-लहान दहशतवादाच्‍या घटनांच्‍या तपासात ते सामील होते.
- काही दिवसांपूर्वी ते पठाणकोट हल्‍ल्यासंदर्भात पाकिस्तानातून आलेल्‍या JIT टीममध्‍ये होते.
- या टीमसोबत भारतीय अधिका-यांच्‍या शिष्‍टमंडळात ते सामील होते.
- एनआयएच्‍या कार्यालयात त्‍यांनी पाकिस्तानी अधिका-यांशी चर्चाही केली होती.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, अशा कारमध्येच कुटुंबीयांसमोर ऑफिसरवर झाडल्या 24 गोळ्या.... जागीच झाला मृत्यू....