आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पठाणकोट हल्ला: सलविंदरसिंग यांच्या घरासह चार ठिकाणी NIA चे छापे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलविंदर यांच्या घरी NIA चा छापा - Divya Marathi
सलविंदर यांच्या घरी NIA चा छापा
अमृतसर - पठाणकोट एअरबेसवरील हल्ल्यानंतर सर्वात प्रथम संशयाच्या फेऱ्यात अडकलेले गुरदासपुरचे माजी एसपी सलविंदरसिंग यांची मंगळवारी पॉलिग्राफी टेस्ट झाली. त्यानंतर आता सुरक्षा यंत्रणांनी त्यांच्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांच्या घरासह चार ठिकाणी गुरुवारी छापेमारी करण्यात आली.
सलविंदर यांच्या घरासह त्यांच्या नातेवाइकांच्या घरांवर एनआयएने गुरुवारी छापेमारी सुरु केली. सलविंदर सिंग याचे सुरुवातीपासूनचे जबाब परस्परविरोधी राहिलेले आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा संशय बळावत चालला आहे.

पॉलिग्राफी टेस्टनंतर त्यांच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवली जात आहे. त्यातच गुरुवारी त्यांच्या संबंधित चार ठिकाणांवर छापेमारी सुरु करण्यात आली. यात काही महत्त्वाची माहिती तपास यंत्रणेच्या हाती लागली असल्याचे समजते. काही ठिकाणी एनआयए टीमने कसून चौकशी केली, मात्र तपास पथक सध्याच कोणतीही माहिती शेअर करण्यास तयार नाही.

आता ब्रेन मॅपिंग आणि सायकलॉजिकल टेस्ट करण्याची एनआयएची तयारी
- मंगळवारी पॉलिग्राफी टेस्ट केल्यानंतर आता एनआयए सलविंदरची ब्रेन मॅपिंग आणि सायकलॉजिकल टेस्ट करण्याची तयारी आहे.
- सूत्रांच्या माहितीनुसार, पॉलिग्राफी टेस्टनंतर सलविंदर यांच्याबद्दलचा संशय अधिक बळावला आहे.
- 'पंज पीर दर्गा'चे केअरटेकर, सलविंदरचा ज्वेलर मित्र राजेश वर्मा आणि कुक मदन गोपाल यांच्याही टेस्ट होण्याची शक्यता आहे.

सलविंदरसोबत काय झाले होते
- दहशतवादी हल्ला होण्याआधी सलविंदरचे कथित अपहरण झाले होते. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचा ज्वेलर मित्र राजेश आणि कुक होता.
- त्यानंतर त्याने जो जबाब नोंदवला त्यामुळे त्याच्यावर संशय वाढत गेला.
- आता सलविंदर प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे.

केव्हा झाला पठाणकोट हल्ला, आतापर्यंत या केसमध्ये काय-काय झाले
- 2 जानेवारीच्या सकाळी 6 वाजता पाकिस्तानी दहशतवादी पठाणकोट एअरबेसमध्ये घुसले आणि त्यांनी गोळीबारासह ग्रेनेड हल्ला केला.
- हल्ल्यात 7 जवान शहीद झाले, तर सहा दहशतवादी मारले गेले.
- 36 तास एन्कांउंटर आणि तीन दिवस कोम्बिंग ऑपरेशन चालू होते.
- हल्ल्याचा मास्टर माइंड जैश-ए-मोहम्मदच्या म्होरक्या मौलाना मसूद अझहर होता.
- अझहरला 1999 मध्ये कंदहार विमान हायजॅक प्रकरणानंतर प्रवाशांच्या सुटकेसाठी भारताने सोडले होते.
- भारताने दहशतवाद्यांचे त्यांच्या हँडलर्ससोबत झालेले बोलणे आणि त्याचे कॉल डिटेल्स, त्यासोबतच त्यांच्याकडे सापडलेले पाकिस्तानात तयार झालेले सामानाचे पुरावे शेजारी देशाला दिले आहेत.
- भारताने पाकिस्तानवर या हल्ल्यातील लोकांवर कारवाईसाठी दबाव आणल्यानंतर मसूद अझहरला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
- दरम्यान भारत-पाकिस्तान यांच्यात 15 जानेवारी रोजी होणारी परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा रद्द झाली.
- हल्ल्याचा तपास एनआयए करत आहे.