आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाम हिंसा: मृतदेहांचा अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकांचा नकार, पहा फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुवाहाटी - आसामच्या काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराचा परिसरात मोठ परिणाम झाला आहे. गेल्या २४ तासांत कोणत्याही प्रकारचा नवीन हल्ला झाल्याची बातमी नाही. तरीही पश्चिम आसाम परिसरातील बोडो आणि बंगाली भाषक मुस्लीमांचे घर सोडून जाण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. पीडित समुदायांच्या सुमारे ३०० नागिरकांनी शिबिरांमध्ये राहत असल्याचे आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी सांगितले. तर दुसरीकडे हिंसेमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांनी मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री तरुण गोगोई पीडितांना भेटून सुरक्षेचे आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राज्यात दोन जिल्ह्यांमध्ये बोडो दहशत वाद्यांनी केलेल्या गोळीबारात गेल्या दोन दिवसांत 32 जणांनी प्राण गमावला आहे. या हिंसाचारात दहशतवाद्यांनी दोन किंवा त्यापेक्षा कमी वय असणार्या बालकांनाही सोडले नाही. विशिष्ट उमेदवाराला मत न दिल्यामुळे नाराज असलेल्या दहशतवाद्यांनी लोकांची हत्या केल्याचे वृत्त आहे. त्याशिवाय शनिवारी बकसा जिल्ह्यातही शनिवारी काही मृतदेह आढळून आले आहेत. येथे जुलै 2012 पासून बोडो दहशतवादी आणि बंगाली मुस्लीमांमध्ये धार्मिक तेढ असल्याचे हिंसाचार सुरू आहे.
प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवा
मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए
) कडे सोपवण्याची मागणी केली आहे. तसेच केंद्र सरकराकडे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या अतिरिक्त तुकड्या पाठवण्याची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले. त्याशिवाय राज्याच्या संवेदनशील भागांमध्ये लष्कर, बीएसएफ आणि इतर दलांना तैनात केल्याचेही त्यांनी सांगितले.
राजकारण सुरुच
काँग्रेसने भाजप आणि नरेंद्र मोदी हेच यासाठी जबाबदार असल्याची टीका यापूर्वीच केली आहे. केंद्रीय कायदे मंत्री कपील सिब्बल यांनी मोदींमुळेच देशभरात वातावरण खराब झाल्याची टीका केली. तर राज्यात काँग्रेसचे सरकार असल्यामुळे यासाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
पुढे पहा घटनेशी संबंधित छायाचित्रे...