आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायजेरियन नागरिकाची हत्या करणार्‍या हल्लेखोरास अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी- गोव्यातील नायजेरियन नागरिकांवरील किरकोळ स्वरूपाचे गुन्हे मागे घेण्यात येणार असून त्यामुळे उपद्रवी नायजेरियन नागरिकांना मायदेशी पाठवण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

गोव्यात राहणार्‍या नायजेरियन नागरिकांविरोधात किरकोळ स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असल्यास ते मागे घेण्यात येणार असून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांनी मायदेशी परत पाठवण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. मात्र, गंभीर गुन्हे असल्यास माफ करण्यात येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अनेक नायजेरियन नागरिकांविरोधात विविध खटले चालू आहेत. त्यामुळेच त्यांना देशाबाहेर हाकलण्यात अडचणी येत आहे, असे सांगून किरकोळ स्वरूपाचे गुन्हे मागे घेऊन न्यायाधीशांच्या परवानगीने संबंधित नागरिकांची रवानगी करण्यात येणार आहे. या वर्षात आतापर्यंत विविध देशांच्या 13 नागरिकांची मायदेशी रवानगी करण्यात आली आहे. या नागरिकांच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ते गोव्यात वास्तव्य करून होते.

घरमालकांवर कारवाई : परदेशी नागरिकांना बेकायदा घरे भाड्याने देणार्‍या घरमालकांवर कारवाई करण्याचा निर्णय पारा गावाच्या पंचायतीने घेतला आहे. नायजेरियन नागरिकाच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर पारा गावात मंगळवारी सायांकाळी विशेष ग्रामसभा घेण्यात आली.या सभेत हा ठराव पारित करण्यात आला. परदेशी नागरिकांना बेकायदा घरे भाड्याने देणार्‍या सर्व गावकर्‍यांना नोटिसा बजावण्यात येणार असून विदेशी भाडेक रूंना तत्काळ हाकला असे आदेश देण्यात येणार आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?
एका नायजेरियन नागरिकाची हत्या झाल्यानंतर गेल्या आठवड्यात पणजीच्या रस्त्यावर नायजेरियन नागरिकांच्या एका टोळक्याने प्रचंड गोंधळ घातला होता. दरम्यान, नायजेरियन नागरिक ओबोदो उझोमोची हत्या करणार्‍या तरुणास अटक करण्यात आली आहे. सुरेंद्र पाल असे त्याचे नाव असून त्याने पारा गावात ओबोदोसह काही जणांची हत्या केली होती.

नायजेरिया सरकारशी बोलणी
नायजेरियन सरकारशी राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू असून गोवा सरकारचा उद्या अहवाल अपेक्षित असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. नायजेरियन उच्चयुक्तांनी गोव्यातील घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून हल्लेखोरास त्वरित पकडण्याची मागणी केली होती. या प्रकरणावरून उभय देशांतील संबंध कमालीचे तणावपूर्ण झाले आहेत.