आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायटेक सिटीत रस्त्यावरून वाहिली नदी; हैदराबादेत ढगफुटीसारखा पाऊस, अशा बुडाल्या कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- तेलंगणाच्या हैदराबाद-सिकंदराबादसह अनेक ठिकाणी सोमवारी ढगफुटीसारख्या पावसाने हाहाकार उडवला. हैदराबादच्या गाची बावली येथे सर्वाधिक फटका बसला आहे. पाण्यात वाहून अनेक वाहने रस्त्यावर आली. भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलगा, त्याच्या वडिलांसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. इतर ठिकाणी वीज कोसळून सहा जण ठार झाले आहेत.

ढगफुटीसारख्या पावसामुळे पुरासारखे पाणी तुंबले. अनेक वाहने वाहून गेली.

मंगळवारी दिली शाळा महाविद्यालयांना सुटी...
- हैदराबाद महापालिकेचे आयुक्त बी रेड्डी यांनी नागरिकांना संयम पाळण्याचे आवाहन केले आहे.
- मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर काल (मंगळवार) शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्‍यात आली होती.
- सोमवारी शहरात 67.6 मीमी पाऊस झाला. अनेक घरांमध्ये पाणी घुसले. तर दुकाने आणि शोरुममधील सामान रस्त्यावर आला.

ऑटो रिक्षा-कार बुडाल्या...
- जोरदार पावसामुळे हैदराबाद शहर पूर्णपणे जलमय झाले आहे.
- अनेक घरात पाणी घुसले असून वीज पुरवठा खंडीत झाला आहे.
- रस्त्यावर पाणी तुंबल्याने अनेक कार आणि रिक्षा पुण्यात बुडाल्या आहेत.

हैदराबादेतील पुरस्थिती पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा..
बातम्या आणखी आहेत...